Rajnath Singh Warning To America On Pakistan Ties: केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अमेरिकेसमोर अत्यंत आक्रमक भूमिका घेत पाकिस्तानला मिळणाऱ्या लष्करी मदतीवर तीव्र आक्षेप घेतला. पाकिस्तानसोबतची अमेरिकेची जवळीक आणि सहकार्य भविष्यात घातक ठरु शकते, असे त्यांनी स्पष्टपणे म्हटले. फिलिपाईन्समधील 13व्या 'आसियान डिफेन्स मिनिस्टर मीटिंग प्लस' परिषदेदरम्यान अमेरिकेचे युद्ध सचिव पीट हेगसेथ यांच्याशी राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांची उच्चस्तरीय बैठक झाली. या महत्त्वपूर्ण बैठकीत भारताने पाकिस्तानला मिळणाऱ्या एफ-16 लढाऊ विमानांच्या अपग्रेड पॅकेज आणि लष्करी तंत्रज्ञानाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला.
बैठकीत बोलताना संरक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केले की, पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत असून अमेरिका देत असलेल्या लष्करी मदतीचा गैरवापर होण्याची दाट शक्यता आहे. अमेरिकेने नुकतेच पाकिस्तानला 68.6 कोटी डॉलरचे मोठे लष्करी पॅकेज मंजूर केले. या पॅकेजच्या माध्यमातून पाकिस्तान आपली जवळपास 70 जुनी एफ-16 लढाऊ विमाने अपग्रेड करण्याच्या तयारीत असून 2030 मध्ये मुदत संपणारी ही विमाने 2040 पर्यंत सक्रिय ठेवण्याचा त्यांचा प्लॅन आहे. या पॅकेजमध्ये एव्हियोनिक्स अपग्रेड, क्रिप्टोग्राफिक मॉड्यूल्स, स्पेयर पार्ट्स आणि सिम्युलेटरचा समावेश आहे, ज्यावर भारताने चिंता व्यक्त केली.
यावेळी भारताने दहशतवादाच्या मुद्द्यावर ‘झिरो टॉलरन्स’ धोरण अवलंबण्याचे आवाहन केले. अमेरिकेने दहशतवाद्यांना फंडिंग आणि ट्रेनिंग देणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भारताने केली. त्यावर अमेरिकन प्रतिनिधींनी भारताला दहशतवादाविरुद्धच्या संघर्षात पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.