Nalini Dainik Gomantak
देश

Rajiv Gandhi हत्याकांड: नलिनीने घेतली सर्वोच्च न्यायालयात धाव, 'समानतेच्या आधारावर...'

Rajiv Gandhi Assassination: राजीव गांधी हत्या प्रकरणातील आणखी एक दोषी नलिनी हिने पेरारिवलनच्या सुटकेचा हवाला देत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

दैनिक गोमन्तक

Rajiv Gandhi Assassination: राजीव गांधी हत्या प्रकरणातील आणखी एक दोषी नलिनी हिने पेरारिवलनच्या सुटकेचा हवाला देत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. समानतेच्या आधारावर आपली सुटका करावी, अशी याचिका नलिनीने न्यायालयात दाखल केली आहे. राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी नलिनी आणि इतर सहा जणांना दोषी ठरवण्यात आले होते. दोषींपैकी एक, पेरारिवलन, ज्याने 31 वर्षे तुरुंगवास भोगला. ज्याची आता सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर नुकतीच सुटका करण्यात आली.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, नलिनी तिचा पती मुरुगन, संथन, जयकुमार, पेरारिवलन, रविचंद्रन आणि रॉबर्ट पायस यांना दोषी ठरवण्यात आले आहे. तामिळनाडूच्या (Tamil Nadu) राज्यपालांना त्यांच्या दयेच्या अर्जावर निर्णय घेण्यास जास्त उशीर करण्याचा अधिकार नसल्याच्या कारणावरुन सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) पेरारिवलन याची निर्दोष मुक्तता केली.

कलम 142 अन्वये सुटकेचा आदेश देण्यात आला

न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने कलम 142 अन्वये मिळालेल्या विशेषाधिकाराचा वापर करुन पेरारिवलन याची सुटका करण्याचे आदेश दिले होते. खंडपीठाने म्हटले होते की, "राज्य मंत्रिमंडळाने संबंधित विचारविमर्शाच्या आधारे निर्णय घेतला. कलम 142 चा वापर करुन दोषींना सोडणे योग्य ठरेल.' राज्यघटनेचे (Constitution) कलम 142 सर्वोच्च न्यायालयाला विशेषाधिकार देते, ज्या अंतर्गत संबंधित प्रकरणामध्ये अन्य कोणताही कायदा लागू होत नाही, तोपर्यंत त्यांचा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.

राजीव गांधी यांची 1991 मध्ये हत्या झाली

21 मे 1991 रोजी तामिळनाडूच्या श्रीपेरुंबदूर येथे एका निवडणूक रॅलीदरम्यान स्फोट घडवणाऱ्या आत्मघातकी बॉम्बरने राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांची हत्या केली होती. 'धनू' असे या मुलीचे नाव आहे. न्यायालयाने आपल्या मे 1999 च्या आदेशात पेरारिवलन, मुरुगन, संथन आणि नलिनी या चार दोषींना सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा कायम ठेवली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Cup 2026 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! T20 वर्ल्ड कप 2026चे वेळापत्रक जाहीर; भारत-पाकिस्तान महामुकाबला कधी?

Goa ZP Election 2025: जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी 'आप-आरजीपी' युतीचे संकेत; मनोज परब म्हणाले, 'सर्व पर्याय खुले'!

T20 World Cup 2026: रोहित शर्मा बनला टी20 वर्ल्ड कप 2026 चा 'ब्रँड ॲम्बेसेडर'; जय शहांची मोठी घोषणा!

Navpancham Yog 2025: डिसेंबर महिन्यात 'या' 3 राशींच्या लोकांचे होणार बल्ले-बल्ले, नवपंचम योग ठरणार वरदान; धनलाभासह करिअरमध्ये सकारात्मक बदलाची चिन्हे!

Goa Politics: 'नोकरी घोटाळ्यातील एजंट भाजपचे', विजय सरदेसाईंचा मोठा गौप्यस्फोट; ढवळीकरांविरोधात षड्यंत्राचा आरोप

SCROLL FOR NEXT