Rajasthan Crime News Dainik Gomantak
देश

''प्रॅक्टिकलमध्ये मार्क्स हवे असतील तर...''; शिक्षकाने प्रयोगशाळेत 12वीच्या विद्यार्थिनीचा केला विनयभंग

Rajasthan Crime News: राजस्थानमधील अलवरमध्ये प्रॅक्टिकल परीक्षेदरम्यान (Practical Exam) एका शिक्षकाने 12वीच्या विद्यार्थिनीचा लॅबमध्ये विनयभंग केला.

Manish Jadhav

Rajasthan News: राजस्थानमधील अलवरमध्ये प्रॅक्टिकल परीक्षेदरम्यान (Practical Exam) एका शिक्षकाने 12वीच्या विद्यार्थिनीचा लॅबमध्ये विनयभंग केला. विद्यार्थिनीने घाबरत-घाबरत आपल्यासोबत घडलेली हकिकत कुटुंबीयांना सांगितली. यानंतर तिच्या कुटुंबीयांसह ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी शिक्षकाला जाब विचारला. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी शिक्षकाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी शाळा प्रशासनाने एक समिती स्थापन केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका विद्यार्थिनीने (Student) किशनगढबस सरकारी शाळेतील प्राध्यापक सतीश चौधरी यांच्यावर विनयभंगाचा आरोप केला आहे. 12वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने म्हटले की, शिक्षक अनेक महिन्यांपासून तिची छेड काढत होते. ते इतर मुलींना लॅबमध्ये बोलावून त्यांचा विनयभंग करायचे. प्रॅक्टिकल परीक्षेत जास्त गुण देण्याच्या बहाण्याने ते तिच्यावर संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत असे.

विद्यार्थिनीने शिक्षकावर हे आरोप केले

शिक्षकाने (Teacher) विद्यार्थिनीला सांगितले होते की, तिला मार्क्स हवे असतील, तर तो सांगेल तसे करावे लागेल. यानंतर त्याने बळाचा वापर करण्यास सुरुवात केली. त्यानंतर मुलीने या प्रकरणाची माहिती कुटुंबीयांना दिली. कुटुंबीयांनी शाळेच्या मुख्याध्यापकांकडे तक्रार केली. यानंतर ग्रामस्थ आणि कुटुंबीयांनी एकच गोंधळ घातला. शाळेमध्ये ग्रामस्थांनी आंदोलन केले. कुटुंबीयांनी सांगितले की, दोन दिवसांपूर्वी त्यांनी शिक्षक सतीशच्या कृत्याबाबत शाळा व्यवस्थापनाकडे तक्रार केली होती. यानंतर शाळेतील इतर काही शिक्षक घरी आले आणि त्यांनी शांतपणे तडजोडीची चर्चा केली.

आरोपी शिक्षक म्हणाला...

शाळेत पोहोचलेल्या लोकांसमोर आरोपी शिक्षकाने सांगितले की, 'त्याने मुलीला कधीही फोन केला नाही. ती शाळेत आली नाही तर तो तिच्या घरच्यांना कळवायचा. नकळत स्पर्श झाला तर सांगता येत नाही, पण माझा हेतू वाईट कधीच नव्हता. मी तिला मुलीप्रमाणे मानतो.' यादरम्यान शिक्षकाने सर्वांसमोर माफीही मागितली.

लोकांचा संताप वाढला

लोकांचा संताप वाढू लागल्यावर शिक्षक मुख्याध्यापकांच्या कार्यालयात जाऊन कपाटाच्या मागे लपले. पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी शाळेत पोहोचून शिक्षकाला ताब्यात घेतले. कुटुंबीयांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे. शाळेच्या मुख्याध्यापकांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक समितीही स्थापन केली असून, ही समिती दोन दिवसांत अहवाल सादर करणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News: तिस्क-उसगाव येथे मध्यरात्री दुचाकीचा भीषण अपघात

Dabos Valpoi: दाबोस-वाळपई रस्ता धोकादायक अवस्थेत! खोदकामामुळे मार्गाची दुर्दशा; अपघाताची शक्यता

Navelim Bele Junction: नावेली-बेले जंक्शनवर अनेक त्रुटी, रस्ते सुरक्षा समितीकडून पाहणी; साबांखा अधिकारी मात्र अनुपस्थित

Porvorim: पर्वरीतील कोंडीत वाहतूक पोलिसांचे हाल! रखरखत्या उन्हात होते आहे होरपळ

Dodamarg Excise Building: दोडामार्ग ‘अबकारी’ कार्यालयाची दुर्दशा! छपरावर आच्छादन, फुटकी कौले; त्वरित दुरुस्तीची मागणी

SCROLL FOR NEXT