Chief Minister Ashok Gehlot Dainik Gomantak
देश

Congress President Election: काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यास गेहलोत यांचा नकार

Congress President Election: राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी आज (Thursday) दिल्लीत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली.

दैनिक गोमन्तक

Rajasthan Political Crisis: राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी आज (Thursday) दिल्लीत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. या बैठकीनंतर त्यांनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढविण्यास नकार दिला. प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, परिस्थिती पाहता अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार नसल्याचा निर्णय घेतला आहे.

'सोनिया गांधींची माफी मागावी'

सीएम अशोक गेहलोत (Ashok Gehlot) म्हणाले की, 'सोनिया गांधींना भेटताना मी माफी मागितली, वाईट वाटले. सोनिया गांधींशी माझी चर्चा झाली. गेल्या 50 वर्षात मी काँग्रेस (Congress) पक्षात निष्ठावान सैनिक म्हणून काम केले. हायकमांडने माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवून अनेक जबाबदाऱ्या सोपवल्या. प्रदेशाध्यक्ष, AICC सरचिटणीस अशा अनेक पदांवर मी काम केले आहे. परंतु दोन दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेने खूप दु:ख झाले आहे.'

अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यास नकार दिला

ते पुढे म्हणाले, 'मी दिल्लीत एक ओळीचा प्रस्ताव मंजूर करु शकलो नाही. काँग्रेसच्या इतिहासात प्रथमच मला याचे वाईट वाटले. मी अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नसल्याचा निर्णय घेतला आहे.'

मुख्यमंत्री पदाबाबत ही गोष्ट बोलली

त्याचवेळी, गेहलोत यांनी राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाबाबत स्पष्टपणे काहीही सांगितले नाही. ते पुढे असेही म्हणाले की, 'राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाचा निर्णय हायकमांड (सोनिया गांधी) घेईल. सोनिया गांधींमुळे (Sonia Gandhi) मला सर्व काही मिळाले, मंत्री झालो, मुख्यमंत्री झालो, घडलेल्या घटनेने मला हादरवून सोडले आहे. परंतु मला मुख्यमंत्रीपदी राहायचे आहे, असा संदेश देशात गेला.'

17 ऑक्टोबर रोजी निवडणूक होणार

काँग्रेस दोन दशकांहून अधिक काळातील पहिला बिगर गांधी कुटुंबीय अध्यक्ष आणण्याच्या तयारीत आहे. तिन्ही गांधी 17 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या निवडणुकीतून बाहेर होतील, आतापर्यंत शशी थरुर यांनी उमेदवारी अर्ज मागवला आहे. या बैठकीदरम्यान आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काँग्रेस मुख्यालयात पोहोचणार आहेत.

तसेच, काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शशी थरुर यांनी उमेदवारी अर्ज घेतला आहे, तर आता पक्षाचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनीही उमेदवारी अर्ज घेतला आहे. मात्र केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री दिल्लीत उपस्थित नसल्याने शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Election 2027: निवडणुकीच्या तोंडावर भाजपचा 'मास्टरस्ट्रोक'; अधिकाधिक महिलांना उमेदवारी देण्याचा निर्णय, विधानसभेत महिला संख्या वाढवणार

Goa Crime: ऐन सणासुदीत राज्यात घरफोड्या अन् सायबर फसवणुकीचे सत्र! तोरसे, दवर्लीत चोरट्यांचा धुमाकूळ; बँकेला 75 लाखांचा चुना

Bicholim Marigold Farming : डिचोली तालुक्यात झेंडूचे मळे केशरी-पिवळ्या फुलांनी बहरले, कृषी खात्याच्या ‘आत्मा’ योजनेला मोठे यश; शेतकऱ्यांच्या मेहनतीला दसऱ्याचे फळ

Asian Para Games 2026: आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंची धमाकेदार सुरुवात! 10 मीटर एअर रायफलमध्ये मोना अग्रवालला 'गोल्ड', तर अवनी लेखराला 'सिल्व्हर'

Goa Mining: 'गाव नष्ट होऊ देणार नाही!' होंडा ग्रामसभेत 'सोलये' खाणीचा प्रश्न ऐरणीवर; एनओसी रोखण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार

SCROLL FOR NEXT