Naxalite Dainik Gomantak
देश

Chhattisgarh: भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सागर साहू यांना नक्षलवाद्यांनी घातल्या गोळ्या

BJP District Vice President Sagar Sahu: भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सागर साहू यांची नक्षलवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे.

Manish Jadhav

BJP District Vice President Sagar Sahu: भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सागर साहू यांची नक्षलवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे. बस्तरमधील नारायणपूर जिल्ह्यातील डोंगर येथे शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सागर साहू यांची नक्षलवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली.

सागर साहू यांना डोंगर येथून नारायणपूर जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे. नक्षलवाद्यांनी सागर साहूच्या घरात घुसून गोळ्या झाडल्याचं सांगण्यात येत आहे. ते आपल्या घरी टीव्ही पाहत असताना ही घटना घडली. हे संपूर्ण प्रकरण छोटेडोंगर पोलीस ठाण्याच्या हद्दीशी संबंधित आहे.

भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सागर साहू

भाजपचे (BJP) जिल्हा उपाध्यक्ष सागर साहू हे बस्तरमधील नक्षलग्रस्त नारायणपूर या डोंगर या छोट्या गावातील रहिवासी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ते घरात टीव्ही पाहत असताना नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.

दुसरीकडे, माहिती मिळताच पोलीस (Police) पथक घटनास्थळी पोहोचले आणि साहू यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवले, तिथे डॉक्टरांनी साहू यांना मृत घोषित केले. या प्रकरणाचा तपास पोलीस अधिकारी करत आहेत.

भाजपशी 25 वर्षे जुने नाते

ही घटना रात्री आठ वाजता घडली. या घटनेनंतर स्थानिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. साहू गेल्या 25 वर्षांपासून भाजपशी निगडित होते. यासोबतच साहू समाजाच्या ग्रामाध्यक्षाची जबाबदारीही त्यांच्यावर होती. हॉस्पिटल प्रशासनाने त्यांना मृत घोषित केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT