Rahul Gandhi Dainik Gomantak
देश

NITI Aayog: राहुल गांधींचा वायनाड मतदारसंघ ठरला अव्वल, 'या' मध्ये केले टॉप!

Rahul Gandhi: नीती आयोगाच्या आकांक्षी जिल्ह्यांच्या यादीत राहुल गांधी यांचा संसदीय मतदारसंघ असलेल्या वायनाडला पहिले स्थान मिळाले आहे.

दैनिक गोमन्तक

NITI Aayog: नीती आयोगाच्या आकांक्षी जिल्ह्यांच्या यादीत राहुल गांधी यांचा संसदीय मतदारसंघ असलेल्या वायनाडला पहिले स्थान मिळाले आहे. मोदी सरकारने आरोग्य, पोषण, आर्थिक समावेशन आणि कौशल्य विकासाच्या बाबतीत प्रगती करणाऱ्या जिल्ह्यांमध्ये वायनाडला पहिले स्थान दिले आहे. जिल्हाधिकारी ए. गीता यांनी नीती आयोगाच्या अहवालात पहिला क्रमांक मिळाल्याची पुष्टी केली आहे.

दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनीही वायनाडच्या या कामगिरीचे कौतुक केले आहे. त्यासाठी सामुहिक प्रयत्नांना राहुल गांधींनी श्रेय दिले आहे. ते 2019 मध्ये वायनाडमधून (Wayanad) निवडून आले होते, तर अमेठीच्या त्यांच्या पारंपरिक जागेवरुन पराभूत झाले होते.

NITI आयोगाच्या अहवालानुसार या यादीत देशातील एकूण 112 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. आकांक्षी जिल्हा योजना जानेवारी 2018 मध्ये सुरु करण्यात आली. या अंतर्गत मानव विकास निर्देशांक सुधारणे आणि नागरिकांचे (Citizens) जीवनमान सुधारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले.

दुसरीकडे, देशातील 112 जिल्ह्यांचे प्रगती अहवाल NITI आयोगाने अनेक पॅरामीटर्सवर तयार केले आहेत. या यादीतील 5 मुख्य पॅरामीटर्समध्ये आरोग्य आणि पोषण, शिक्षण, कृषी आणि जलसंपत्ती यांचा समावेश आहे. राहुल गांधींचे सचिव ऑगस्टीन पल्पल्ली म्हणाले की, 'राहुल गांधींनी वायनाडला पुढे आणण्यात पूर्ण रस घेतला आहे. मतदारसंघात त्यांनी पूर्ण लक्ष ठेवले आहे. एक काळ असा होता की, वायनाड जिल्हा कुपोषणासाठी कुप्रसिद्ध होता. पण आता परिस्थिती झपाट्याने सुधारत आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT