Bharat Nyay Yatra Rahul Gandhi X, @amitmalviya
देश

Video: राहुल गांधींनी कुत्र्याचे बिस्किट दिले काँग्रेस कार्यकर्त्याला? भाजप नेत्याचा खळबळजनक दावा

Rahul Gandhi: राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस भारत जोडो न्याय यात्रा काढत आहे. 14 जानेवारी रोजी मणिपूरची राजधानी इंफाळ येथून हा प्रवास सुरू झाला असून, सध्या ही यात्रा झारखंडमध्ये आहे.

Ashutosh Masgaunde

Rahul Gandhi picked up the biscuit from the dog and gave it to the Congress worker, BJP's IT cell head Amit Malviya shares video:

भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान राहुल गांधींनी कुत्र्यासमोर असलेले बिस्किट उचलून काँग्रेस नेत्याला दिल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. असा दावा भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनीही सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करताना केला आहे.

अमित मालवीय यांनी व्हिडिओसोबत शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, 'काही दिवसांपूर्वीच काँग्रेस अध्यक्ष खर्गे जी यांनी पक्षाच्या बूथ एजंटची तुलना कुत्र्यांशी केली होती आणि इथे राहुल गांधी कुत्र्याला बिस्किटे खाऊ घालत आहेत आणि जेव्हा कुत्र्याने खाल्ली नाही, तेव्हा त्यांनी ते बिस्किट कार्यकर्त्याला दिले. ज्या पक्षाचे अध्यक्ष आणि युवराज आपल्या कार्यकर्त्यांना कुत्र्यासारखे वागवतात, तो पक्ष गायब होणे स्वाभाविक आहे.

भाजप नेत्या पल्लवी सीटी यांनीही या व्हिडिओवरून राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, 'आता राजकुमारने कुत्र्याने नाकारलेली बिस्किटे पक्षाच्या एका कार्यकर्त्याला दिली. पक्षाचे कार्यकर्ते, समर्थक आणि मतदारांची ते किती किंमत करतात पाहा.'

पल्लवी सीटी यांनी यावेळी जुनी आठवणही सांगितली जेव्हा राहुल गांधींनी हिमंता बिस्वा सरमा यांना त्याच प्लेटमध्ये बिस्किटे दिली होती ज्यामध्ये त्यांचा पाळीव कुत्रा खात होता.

पल्लवी यांच्या पोस्टला उत्तर देताना आसामच्या मुख्यमंत्र्यांनी लिहिले की, 'केवळ राहुल गांधीच नाही तर संपूर्ण गांधी कुटुंब मला ते बिस्किट खाऊ घालू शकले नाही. मला आसामी आणि भारतीय असल्याचा अभिमान आहे. मी बिस्किटे खाण्यास नकार दिला आणि काँग्रेसचा राजीनामा दिला.'

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस भारत जोडो न्याय यात्रा काढत आहे. 14 जानेवारी रोजी मणिपूरची राजधानी इंफाळ येथून हा प्रवास सुरू झाला. सध्या ही यात्रा झारखंडमध्ये असून येत्या काही दिवसांत छत्तीसगडला जाणार आहे. भाजप नेत्यांनी शेअर केलेला व्हिडिओ भारत जोडो न्याय यात्रेतील असल्याचे बोलले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs Pak: भारत विरुद्ध पाकिस्तान 'महामुकाबल्या'त Team India ची प्लेइंग 11 कशी असेल? कोणाला डच्चू, कोणाला संधी?

Best Destination For Solo Travel: सोलो ट्रिपसाठी परफेक्ट! महिलांसाठी सुरक्षित मानली जाणारी 'ही' टॉप ठिकाणं, एकदा नक्की भेट द्या

Railway Accident: पत्नी दारूच्या नशेत रेल्वे ट्रकवर बसली, वाचवायला गेलेल्या पतीचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू; वेरोड्यातील दुर्घटना

Sal: भेडशीत तिळारी, दोडामार्गात मणेरी नावाने ओळखली जाणारी गोव्यातील शापुरा नदी; सौंदर्यसंपन्न बनलेला 'साळ गाव'

Mapusa Theft: पुन्हा त्याच ठिकाणी चोरी! दिवसाढवळ्या दुचाकी लंपास, म्हापसा बनतंय का चोरट्यांचे राज्य?

SCROLL FOR NEXT