Rahul Gandhi  Dainik Gomantak
देश

Rahul Gandhi: ''त्यांना आजचा तरुण दिवसभर मोबाईलवर राहणारा, जय श्री राम म्हणणारा अन्...''; राहुल गांधींचा मोदींना टोला

Rahul Gandhi in Shajapur: शाजापूरला पोहोचलेल्या भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एका सभेला संबोधित केले.

Manish Jadhav

Rahul Gandhi in Shajapur: शाजापूरला पोहोचलेल्या भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एका सभेला संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की, ''आज संपूर्ण देशात बेरोजगारीची स्थिती आहे. अग्निवीर योजना आणून मोदी सरकारने तरुणांना बेरोजगारीच्या खाईत लोटले आहे.'' यासोबतच मागासवर्गीयांचा मुद्दा उपस्थित करताना त्यांनी केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारवर जोरदार टीका केली, यासोबतच ते म्हणाले की, ''मोदीजींना आजचा तरुण दिवसभर मोबाईलवर राहणारा, जय श्री राम म्हणणारा, आणि भुकेने मरणारा हवा आहे.''

राहुल यांच्या ताफ्यासमोर 'मोदी-मोदी'च्या घोषणा

दरम्यान, नियोजित मार्गानुसार न्याय यात्रा माझनिया जोड धोबी चौक, टाकी चौक मार्गे ट्रफिक पॉंइंट पोहोचली. येथे भाजप कार्यकर्त्यांनी राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) ताफ्यासमोर 'मोदी-मोदी'च्या घोषणा दिल्या. यानंतर राहुल गांधी आपल्या गाडीतून खाली उतरले आणि भाजप कार्यकर्त्यांना भेटायला गेले. मिळालेल्या माहितीनुसार, राहुल गांधींनी घोषणाबाजी करणाऱ्या लोकांना टॉफीचे वाटप केले. त्याचवेळी, भाजप कार्यकर्त्यांनी राहुल गांधींना बटाटे भेट दिले.

काँग्रेसमध्ये दुफळी पाहायला मिळाली

राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेबाबत काँग्रेसजनांमध्ये प्रचंड उत्साह आहे. शाजापूर राजगढच्या सीमावर्ती शहर सारंगपूरपासून ते मकसीपर्यंत काँग्रेस कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी राहुल गांधींच्या स्वागताचे होर्डिंग लावले होते. सुमारे 50 किलोमीटरच्या या प्रवासात हजारो फ्लेक्स आणि होर्डिंग्ज लावण्यात आले होते, हे विशेष. मात्र या फ्लेक्समध्ये काँग्रेसमधील (Congress) गटबाजीही दिसून आली. यामध्ये दिग्विजय सिंह गट, कमलनाथ गट आणि जितू पटवारी गटाचे फ्लेक्स वेगवेगळ्या पद्धतीने पाहायला मिळाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT