Rahul Gandhi Dainik Gomantak
देश

Modi Surname Defamation Case: राहुल गांधींची याचिका फेटाळली, २ वर्षांची शिक्षा कायम

Gujarat High Court: कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करण्याचे कोणतेही योग्य कारण आम्हाला दिसत नाही.

Ashutosh Masgaunde

Modi Surname Case: काँग्रेस नेते आणि माजी खासदार राहुल गांधी यांना मोदी आडनाव प्रकरणात मोठा झटका बसला आहे. गुजरात हायकोर्टाने राहुल गांधी यांची याचिका फेटाळली आहे. आता अपील फेटाळण्यात आल्याने राहुल गांधी यांची २ वर्षांची शिक्षा कायम राहणार आहे.

राहुल गांधी यांनी सुरत न्यायालयाच्या त्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते, ज्यात त्यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती.

राहुल गांधींविरोधात किमान 10 खटले प्रलंबित असल्याचे गुजरात उच्च न्यायालयाने सांगितले. हा गुन्हा दाखल झाल्यानंतरही त्याच्यावर अन्य गुन्हे दाखल करण्यात आले. वीर सावरकरांच्या नातवाच्या वतीनेही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशा स्थितीत त्यांना दोषी ठरवण्याचा निर्णय त्यांच्यासाठी अन्यायकारक आहे असे म्हणता येणार नाही, असेही गुजरात उच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्यांना दोषी ठरवण्याचा निर्णय पूर्णपणे योग्य आहे.

कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करण्याचे कोणतेही योग्य कारण आम्हाला दिसत नाही. आता राहुल गांधींकडे सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा पर्याय आहे.

घटनाक्रम

13 एप्रिल 2019: मोदी आडनावावर विधान

23 मार्च 2023: राहुल गांधी दोषी ठरले, त्यांना 2 वर्षांची शिक्षा

24 मार्च 2023: लोकसभेचे सदस्यत्व रद्द

25 मार्च 2023: राहुल गांधींनी माफी मागण्यास नकार दिला.

27 मार्च 2023: बंगला सोडण्याची सूचना

22 एप्रिल 2023: राहुल गांधींनी बंगला सोडला

7 जुलै 2023: याचिकेवर गुजरात उच्च न्यायालयाचा निर्णय

राहुल गांधी यांनी संसदेचे सदस्यत्व का गमावले?

2019 मध्ये राहुल गांधींनी कर्नाटकमधील रॅलीमध्ये वादग्रस्त विधान केले होते. मोदी आडनावाबाबत त्यांनी वादग्रस्त टिप्पणी केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत काँग्रेस नेत्याने सर्व चोरांना मोदी हे आडनाव का आहे, असे म्हटले होते.

या विधानावर गुजरातचे भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी स्थानिक न्यायालयात राहुल गांधींविरोधात फौजदारी मानहानीचा खटला दाखल केला.

काँग्रेस नेत्याने संपूर्ण मोदी समाजाला चोर म्हटले असल्याचा दावा भाजप आमदाराने केला. या प्रकरणी सुरतच्या न्यायालयाने राहुल गांधींना 2 वर्षांच्या शिक्षेसह 15 हजारांचा दंड ठोठावला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT