Rahul Gandhi Accident Dainik Gomantak
देश

Rahul Gandhi Accident: राहुल गांधींच्या ताफ्यातील गाड्यांची धडक; पूर्वांचल एक्स्प्रेसवेवर अपघात, अनेक जण जखमी VIDEO

Rahul Gandhi Convoy Accident: उत्तर प्रदेशात राहुल गांधी यांच्या ताफ्यातील अनेक गाड्या एकमेकांवर आदळल्याची घटना समोर आली आहे.

Sameer Amunekar

Rahul Gandhi Purvanchal Expressway Accident

उत्तर प्रदेशात राहुल गांधी यांच्या ताफ्यातील अनेक गाड्या एकमेकांवर आदळल्याची घटना समोर आली आहे. पूर्वांचल एक्स्प्रेसवेवर झालेल्या या अपघातात काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सुरक्षेशी संबंधित काही जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेत राहुल गांधी सुरक्षित असल्याची माहिती आहे.

एक्स्प्रेसवेवरील ९१ व्या किलोमीटरजवळ अपघात

मिळालेल्या माहितीनुसार, पूर्वांचल एक्स्प्रेसवेवरील ९१ व्या किलोमीटरच्या मैलाच्या दगडाजवळ हा अपघात झाला. राहुल गांधी यांच्या ताफ्यातील पाच गाड्या आणि एक रुग्णवाहिका यांची एकमेकांना धडक बसल्याचे सांगण्यात येत आहे. या धडकेमुळे ताफ्यातील काही जण जखमी झाले असून, जखमींची नेमकी संख्या आणि त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.

लखनऊहून सुलतानपूरला जात असताना घटना

राहुल गांधी हे लखनऊहून सुलतानपूरच्या दिशेने प्रवास करत होते. त्याचदरम्यान हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. ताफ्यातील गाड्यांची एकमेकांना धडक कशी बसली, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अपघातानंतर जखमींना वैद्यकीय मदत देण्यात आली आहे का, तसेच प्रशासनाकडून पुढील कोणती कार्यवाही करण्यात आली, याबाबत अधिकृत तपशीलाची प्रतीक्षा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

SIR Protest India: 'एसआयआर'विरोधी आंदोलन निर्णायक वळणावर

Goa Politics: 'तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना'; मगो-भाजप युतीत फोंडा-शिरोड्याचा पेच!

Goa Politics: आरजीतील अंतर्गत वाद पुन्हा चिघळला! 'पक्षाला हानी पोहोचवल्यास कारवाई', वीरेश बोरकरांचा खोलकरांना इशारा

'Mumbai Indians'ची नवी रणनीती! प्रशिक्षक बदलल्यानंतर आता कर्णधारपदावरून हार्दिक पांड्याची सुट्टी? रोहित शर्माच्या हाती पुन्हा संघाची कमान; दिग्गजाची मोठी भविष्यवाणी

Querim Forest Hunting: केरीच्या जंगलात शिकाऱ्यांचा वावर वाढल्याचा संशय; वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी बॉम्बचा वापर?

SCROLL FOR NEXT