QUAD Group Malabar Exercise Dainik Gomantak
देश

QUAD Group Malabar Exercise: चीनला नमवण्यासाठी ऑस्ट्रेलियात होणार क्वाड ग्रृपचा दहा दिवसांचा युद्धसराव

QUAD Group Malabar Exercise: त्यानंतर या चार देशांना जगभरात क्वाड ग्रृप म्हणून ओळख मिळाली आहे.

दैनिक गोमन्तक

QUAD Group Malabar Exercise: जगभरात भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या चार देशांची क्वाड ग्रृप अशी ओळख आहे. आर्थिक, व्यापार आणि लष्करी सेवांचे आदान-प्रदान आणि मदत करण्याच्या उद्देशाने हा ग्रृप निर्माण केला आहे. अनेकदा हिंदी महासागरात चीनचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी या ग्रृपची स्थापना करण्यात आली आहे असे म्हटले जाते.

आता ऑस्ट्रेलियात या क्वाड ग्रृपचा युद्धसराव होणार आहे. महत्वाचे म्हणजे, क्वाडचा युद्धसराव पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियात होणार असून चार देशांची नौसेना या दहा दिवसीय लष्करी सरावात सहभागी होणार आहे. चार देशांच्या सैन्यात उत्तम समन्वय साधण्यासाठी हा युद्धसराव उपयुक्त ठरणार आहे. ऑस्ट्रेलियन जलक्षेत्रात सुरू होणारा हा सराव 11 ते 21 ऑगस्ट दरम्यान चालणार आहे.

कधी झाली सुरुवात?

1992 साली भारत आणि अमेरिका या दोन देशांमध्ये वार्षिक नौदलाच्या मालाबार युद्धसरावाला सुरवात झाली. 2015 ला या नौदल सरावात जपाननेदेखील सहभाग झाले.

2020 मध्ये ऑस्ट्रेलियाचे नौदलाने सहभागी झाले होते. त्यानंतर या चार देशांना जगभरात क्वाड ग्रृप म्हणून ओळख मिळाली आहे.

आता होणाऱ्या युद्धसरावात ऑस्ट्रेलियाची HMAS ब्रिस्बेन आणि HMAS Chawls ही जहाजे सामील होणार आहेत.

भारताच्या नौसेनेचे प्रतिनिधित्व स्टील्थ फ्रिगेट, आईएनएस सह्याद्री आणि स्वदेशी डेस्ट्रॉयर आईएनएस कोलकाता करणार आहे.

याबरोबरच, अमेरिका आणि जपान आपल्या शक्तीशाली नौसेनेसह सामील होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

दरम्यान, या युद्धसरावानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांचा द्विपक्षीय AUSINDEX या नौसेनेचा युद्धसरावाला सुरुवात होणार आहे. आता चीन क्वाडच्या वाढत्या शक्तीला कसे प्रत्युत्तर देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

SCROLL FOR NEXT