BJP Government  Dainik Gomantak
देश

उत्तराखंडमध्ये पुष्करसिंह धामी; मणिपूरमध्ये बीरेन सिंह

बीरेन सिंह यांच्यासमवेत पाच मंत्र्यांची कॅबिनेटपदाची शपथ

दैनिक गोमन्तक

पणजी: गोवा आणि उत्तराखंडमधील विधानसभा निवडणुकीत भाजपने नेत्रदीपक यश मिळविल्यानंतर पक्षश्रेष्ठींनी पूर्वीच्याच भिडूंवर विश्वास ठेवणे पसंत केले आहे. गोव्याच्या मुख्यमंत्रिपदी प्रमोद सावंत यांचे नाव जाहीर करण्यात आले असून उत्तराखंडमध्ये पुष्करसिंह धामी हेच मुख्यमंत्री असतील. तसेच एन. बीरेन सिंह यांनी आज सलग दुसऱ्यांदा मणिपूरच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

बीरेन सिंह यांच्यासमवेत पाच मंत्र्यांनी कॅबिनेटपदाची शपथ घेतली. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरचे मुख्यमंत्री बीरेन सिंह यांचे अभिनंदन केले असून ट्विटरवर म्हटले की, एन.बीरेन सिंह यांची टीम मणिपूरच्या विकासाला आणखी नव्या उंचीवर नेतील आणि गेल्या पाच वर्षात सुरू असलेली विकासकामे पुढेही सुरूच ठेवतील, असा विश्‍वास वाटतो.

राजभवन येथे आयोजित शपथविधी सोहळ्याला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा उपस्थित होते. राज्यपाल गणेशन यांनी मंत्रिपदाची आणि गोपनियतेची शपथ दिली. 61वर्षीय मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांच्याशिवाय नेमचा किपगेन, खेमचंद सिंह, थोंगम विश्‍वजित सिंग, अवंगबौ न्यूमाई आणि गोविंदास कोंथोजम यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.

मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह म्हणाले, की मणिपूरसाठी मला सुरवातीला तीन कामे करायची आहेत. पहिले म्हणजे राज्याला भ्रष्टाचारमुक्त करणे. यासाठी आपण अहोरात्र काम करू. दुसरे म्हणजे राज्यात अमली पदार्थाची तस्करी रोखणार असून तिसरे म्हणजे राज्यातील सर्व बंडखोरांना चर्चेसाठी राजी करू.भाजपला बहुमत दिल्याबद्धल त्यांनी जनतेचे आभार मानले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याची विकासाची वाटचाल सुरू राहील, असे नमूद केले.

पराभूत होऊनही धामींवर विश्वास

मागील अकरा दिवसांपासून कायम असलेला उत्तराखंडच्या मुख्यमंत्रिपदाचा सस्पेन्स दूर झाला असून पुष्करसिंह धामी हेच मुख्यमंत्रिपदी विराजमान होतील असे आज पक्ष श्रेष्ठींकडून जाहीर करण्यात आले. येत्या बुधवारी (ता.23) धामी यांचा शपथविधी पार पडेल. यंदा खातिमा मतदारसंघातून पराभूत होऊन देखील पक्षश्रेष्ठींनी धामी यांच्यावरच विश्वास दाखविल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर केंद्रीय निरीक्षक राजनाथसिंह यांनी धामी यांच्या नावाची घोषणा केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT