Bhagwant Mann Dainik Gomantak
देश

'मी सोशल मीडियावर असे व्हिडिओ पोस्ट करेन...', मुलीनंतर भगवंत मान यांना पहिल्या पत्नीची धमकी

Punjab CM Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यांमुळे चर्चेत आले आहेत.

Manish Jadhav

Punjab CM Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यांमुळे चर्चेत आले आहेत. मान यांची पहिली पत्नी प्रीत ग्रेवाल यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे मान यांना धमकी दिली आहे. त्या म्हणाल्या की, 'लवकरच त्या असे व्हिडिओ पोस्ट करणार आहेत, ज्यामध्ये भगवंत मान यांनी दारु पिऊन नग्न डान्स केला आहे.' एक दिवसापूर्वीच भगवंत मान यांच्या लेकीनेही मान यांच्यावर गंभीर आरोप केले होते. तिने म्हटले होते की, 'ते दारु पिऊन गुरुद्वारात जातात.'

भगवंत मान यांच्या पहिल्या पत्नीने फेसबुकवर काय लिहिले?

दरम्यान, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची पहिली पत्नी प्रीत ग्रेवाल यांनी फेसबुक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले की, ''त्यांनी हे सुरु केले, आता मी त्यांना सांगेन...'' प्रीत यांनी पंजाबी भाषेत लिहिले आहे की, 'मी भगवंत मान यांचा व्हिडिओ शेअर करेन ज्यामध्ये ते दारु पिऊन नग्न डान्स करत आहेत.'

भगवंत मान यांच्याबद्दल मुलगी सीरत कौर काय म्हणाली

दुसरीकडे, मान यांची लेक सीरत कौर हिने वडिलांवर खळबळजनक आरोप केले आहेत. माझे वडील दारु पिऊन गुरुद्वारात जातात. ते आता तिसऱ्या मुलाचे बाप होणार आहेत, असे तिने म्हटले होते. दुसरीकडे, शिरोमणी अकाली दलाचे नेते बिक्रम सिंह मजिठिया यांनी शनिवारी पत्रकार परिषदेदरम्यान सीरत कौरचा व्हिडिओ दाखवला.

दुसरीकडे, वादग्रस्त व्हिडिओमध्ये सीरत कौर तिचे वडील भगवंत मान यांच्यावर आरोप करताना दिसत आहे. भगवंत मान यांनी तिची आणि भावाची जबाबदारी घेण्यास नकार दिल्याचे सीरतने म्हटले आहे. व्हिडिओमध्ये सीरत विचारले की, ''जर एखादी व्यक्ती आई-वडिलांची जबाबदारी पार पाडू शकत नसेल, तर त्याला राज्य चालवण्याची जबाबदारी कशी सोपवली जाऊ शकते?''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT