Crime News Dainik Gomantak
देश

Punjab: पंजाबच्या संगरुरमध्ये विषारी दारु प्यायल्याने मृत्यूचा तांडव; आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू

Punjab Crime: पंजाबमधील संगरुरमध्ये विषारी दारु प्यायल्याने 21 जणांचा मृत्यू झाला आहे. तर काहींवर उपचार सुरु आहेत.

Manish Jadhav

Punjab Crime: पंजाबमधील संगरुरमध्ये विषारी दारु प्यायल्याने 21 जणांचा मृत्यू झाला आहे. तर काहींवर उपचार सुरु आहेत. याप्रकरणी सध्या पोलिसांनी 6 जणांना अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या जिल्ह्यातील ही घटना आहे. या प्रकरणात पोलिसांनी इथेनॉल आणि कच्चा मालही जप्त केला जो दारु बनवण्यासाठी वापरला जात होता. दरम्यान, या घटनेच्या संदर्भात अतिरिक्त पोलीस महासंचालक (ADGP) दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली चार सदस्यीय विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले आहे.

आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू झाला

पोलिस उपमहानिरीक्षक हरचरण सिंह भुल्लर यांनी सांगितले की, या घटनेत आतापर्यंत 21 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. याप्रकरणी आम्ही दोन जणांना अटक केली आहे. तपास सुरु असून दोषींना सोडले जाणार नाही. लोकसभा निवडणुकीपूर्वी मतदारांना आकर्षित करण्यासाठी बनावट दारुची विक्री हा एक भाग असू शकतो, असे पोलिसांनी यापूर्वी म्हटले होते. बुधवारी, कथितरित्या बनावट दारु प्यायल्याने पाच जणांचा मृत्यू झाला तर काहींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत

दुसऱ्या दिवशी पटियाला येथील राजिंद्र रुग्णालयात उपचारादरम्यान आणखी तीन जणांचा मृत्यू झाला. गुरुवारी रात्री उशिरा आणखी दोघांचा मृत्यू झाला तर शुक्रवारी सकाळी चार जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे या घटनेत आतापर्यंत 21 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. आतापर्यंत विषारी दारु पिऊन एकूण 40 जण वेगवेगळ्या रुग्णालयात पोहोचले आहेत. त्यापैकी 10 जणांवर पटियालाच्या राजिंद्र रुग्णालयामध्ये आणि 6 जणांवर संगरुर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. त्यापैकी संगरुर सिव्हिल रुग्णालयामधील 2 तर राजिंद्र रुग्णालयामधील एक रुग्ण उपचाराअभावी रुग्णालयामधून पळून गेला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi: "चोरी चोरी, चुपके चुपके..." राहुल गांधींनी केला 'वोट चोरीचा' व्हिडिओ; निवडणूक आयोगावर साधला निशाणा

Crime News: देवगड- फणसे समुद्रकिनाऱ्यावर आढळला शीर नसलेला मृतदेह, घात की अपघात?

काश्मीरनंतर 'द बंगाल फाइल्स'वरुन वाद; ट्रेलर लाँचवेळी कोलकातामध्ये गोंधळ, अग्निहोत्री म्हणाले, 'हुकूमशाही चालणार नाही'

Rain Dogs Exhibition: गोव्यात रविवारी 'रेन डॉग्स' प्रदर्शनाचं आयोजन, छायाचित्रांतून पाहता येणार 'भटक्या कुत्र्यांचे' वास्तव

Horoscope: कृष्ण जन्माष्टमीला गजकेसरी योग! 'या' 3 राशींना नशिबाची साथ; मिळेल आर्थिक लाभ

SCROLL FOR NEXT