Prime Minister Namenda Modi launces Mission-Urban 2.0 & AMRUT 2.0 Twitter @ANI
देश

गांधीजींना आठवत मोदींचे स्वच्छ भारत मिशन 2.0 !

या योजनेअंतर्गत देशातील पाचशे शहरांमध्ये कचरा व्यवस्थापन मजबूत करणे, पिण्याच्या पाण्याच्या सुविधा सुधारण्याचे काम केले जाईल.(Mission-Urban 2.0)

दैनिक गोमन्तक

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी शुक्रवारी स्वच्छ भारत मिशन-अर्बन 2.0 (Mission-Urban 2.0) लाँच केले आहे. या योजनेअंतर्गत देशातील पाचशे शहरांमध्ये कचरा व्यवस्थापन मजबूत करणे, पिण्याच्या पाण्याच्या सुविधा सुधारण्याचे काम केले जाईल.या योजनेचा शुभारंभ करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आपण देशभरात स्वच्छता मोहीम (Swachh Bharat Abhiyan ) राबवून स्वच्छ भारत मिशनचा पहिला टप्पा पूर्ण केला आहे. आता शहरे कचरामुक्त करण्याचे आमचे लक्ष्य आहे, या मोहिमेसोबतच अमृत मिशन (AMRUT 2.0) देखील काम करेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत मिशनद्वारे देशाने जे काही साध्य केले आहे. यावरूनच लक्षात येते की प्रत्येक भारतीय आपल्या कर्तव्यांबाबत संवेदनशील आहे.बाबत संवेदनशील आहे. आमचे सफाई कामगार खऱ्या अर्थाने या मोहिमेचे नायक आहेत, त्यांनी कोरोना काळातही त्यांचे काम जबाबदारीने पूर्ण केले.

पीएम मोदी म्हणाले की, सर्व शहरांचे महापौर, आयुक्त आणि इतर अधिकाऱ्यांनी हे काम एक मिशन म्हणून घ्यावे, कारण याचा थेट फायदा आपल्याला होईल.

पीएम मोदी म्हणाले की, आता लोक ओला आणि सुका कचरा स्वतंत्रपणे त्यांच्या घरात ठेवत आहेत, ते इतर लोकांनाही जागरूक करत आहेत. पंतप्रधान मोदी म्हणाले की, कोरोनाच्या काळात जरी काही सुस्ती आली असली तरी प्रत्येक राज्य, जिल्हा, शहर, गाव यांचे प्रशासन पुन्हा जागे झाले पाहिजे.

पीएम मोदी म्हणाले की, 'सांडपाणी आणि सेप्टिक व्यवस्थापन वाढवणे, आमच्या शहरांना 'पाणी सुरक्षित शहर बनवणे' आणि आमच्या नद्यांमध्ये कुठेही गलिच्छ गटार पडणार नाही याची खात्री करणे. हे आमचे काम आहे आणि आम्ही हे काम महात्मा गांधींच्या जयंतीच्या एक दिवस आधी करत आहोत.से सांगत त्यांनी गांधीजींचं स्मरण केलं.

आपल्या भाषणात पीएम मोदी म्हणाले की, असमानता दूर करण्याचे एक उत्तम माध्यम म्हणून बाबासाहेबांचा शहरी विकासावर विश्वास होता. चांगल्या आयुष्याच्या आकांक्षेत गावांमधून बरेच लोक शहरांमध्ये येतात. आम्हाला माहित आहे की त्यांना रोजगार मिळतो परंतु त्यांचे राहणीमान अगदी खेड्यांमध्येही कठीण परिस्थितीतच असते. पीएम मोदी म्हणाले की, हे त्यांच्यावर दुहेरी फटका बसण्यासारखे आहे. एक, घरापासून दूर, आणि वरून अशा परिस्थितीत राहणे. ही परिस्थिती बदलल्यावर बाबासाहेबांनी ही विषमता दूर करण्यावर खूप भर दिला. स्वच्छ भारत मिशन आणि मिशन अमृतचा पुढील टप्पा देखील बाबासाहेबांची स्वप्ने पूर्ण करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.असे मत यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे.

स्वच्छ भारत अभियान-शहरी 2.0, अमृत 2.0 अंतर्गत स्वच्छ पाणी, कचरा व्यवस्थापन, कचरामुक्त शहरे आणि इतर क्षेत्रांसह देशातील विविध शहरांमध्ये गुंतवणूक केली जाईल. सुमारे 500 शहरे, 4000 गांवामध्ये ही योजना राबवण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT