PM Modi Jacket
PM Modi Jacket Dainik Gomantak
देश

PM Modi: पंतप्रधान मोदींनी घातले प्लॅस्टिकचे जॅकेट, नेमकं काय आहे कारण

दैनिक गोमन्तक

PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी सतत चर्चेत असतात. आता ते त्यांच्या जॅकेटमुळे चर्चेत आलेत. मोदींनी परिधान केलेले आकाशी रंगाचे जॅकेट चर्चेचा विषय ठरले आहे. टाकून दिलेल्या प्लास्टिकच्या बाटल्यांचा पुनर्वापर करून हे जॅकेट तयार करण्यात आले आहे.

बेंगलोर येथील इंडिया एनर्जी वीकमध्ये इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने पंतप्रधान मोदींना हे जॅकेट भेट दिले आहे. टाकून दिलेल्या प्लास्टिकच्या बाटल्यांपासून अशाच पद्धतीने व्यापक प्रमाणावर कपडे बनवण्याची कंपनीची योजना आहे.

अनबॉटल इनिशिएटिव्ह असे या योजनेचे नाव असून तामिळनाडू( Tamilnadu )तील करूर येथील श्री रेंगा पॉलिमर्स या कंपनीनं पंतप्रधान मोदींसाठी हे जॅकेट तयार केले असल्याची माहिती मिळाली आहे.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने दरवर्षी 100 दशलक्ष टाकून दिलेल्या प्लॅस्टिक बाटल्यांचा पुनर्वापर करण्याची योजना आखली आहे. पुर्नप्रक्रिया या केलेल्या बाटल्यांपासून कपडे तयार केले जाणार आहेत.

चाचणी म्हणून इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या तज्ज्ञांनी हे जॅकेट तयार केले आहे. हे जॅकेट मोदीं( Modi )ना भेट देण्यात आले होते. एक पूर्ण ड्रेस बनवण्यासाठी सुमारे 28 बाटल्यांचा तर फक्त जॅकेटसाठी 15 बाटल्यांचा पुनर्वापर केला जातो.

कंपनीने दरवर्षी 100 दशलक्ष पीईटी बाटल्यांचा पुनर्वापर करण्याची योजना आखली आहे. यामुळे पर्यावरणाचं रक्षण होण्यास मदत होईल आणि पाण्याचीही मोठ्या प्रमाणात बचत होईल.

दरम्यान, पीईटी बाटल्यांचा वापर करून सशस्त्र दलांसाठी नॉन-कॉम्बॅट युनिफॉर्म बनवण्याची आयओसीची योजना आहे. पर्यावरण वाचवण्याचा संदेश देण्यासाठी मोदींनी संसदेत हे आकाशी रंगाचे जॅकेट घातल्याचे म्हटले जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UEN For Goa Students: गोव्यात बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार पर्मनंट एज्यूकेशन नंबर, कसा होणार फायदा?

Loksabha Election 2024 : एनडीए आघाडीला २०० पार होणेही मुश्कील : डॉ. शशी थरूर

Goa Today's Live News: भाजप सरकार सिद्धी नाईक खून प्रकरणाचा गेल्या तीन वर्षात छडा लावण्यात अपयशी ठरले -काँग्रेस

Konkan Railway : कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडणार; माजोर्डा उड्डाण पुलाच्या कामामुळे परिणाम

OpenAI ची मोठी तयारी, ChatGPT नंतर सर्च इंजिन करु शकते लॉन्च; Google ला देणार टक्कर

SCROLL FOR NEXT