Draupadi Murmu Dainik Gomantak
देश

Kargil Vijay Diwas: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी केला शूरवीरांना सलाम, ट्विट करत म्हणाल्या..

President Draupadi Murmu First Tweet: कारगिल विजय दिवसानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंसह देशातील अनेक नेत्यांनी योद्धांचं स्मरण करत ट्विट केलं आहे.

दैनिक गोमन्तक

देशात दरवर्षी 26 जुलैला कारगिल विजय दिवस (Kargil Vijay Diwas) साजरा करतो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वोच्च पद स्वीकारल्यानंतर कारगिल युद्धातील शूर पुत्रांच्या नावाने पहिले ट्विट केलं आहे.

या प्रसंगी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांनी आपल्या पहिल्या ट्विटमध्ये लिहिले की, "कारगिल विजय दिवस हा आपल्या सशस्त्र दलांच्या असामान्य शौर्याचे, पराक्रमाचे आणि दृढनिश्चयाचे प्रतीक आहे. भारत मातेच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व शूर सैनिकांना मी नमन करतो. तमाम देशवासी त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे सदैव ऋणी राहतील. जय हिंद!''

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनीही ट्विट करून कारगिल विजय दिवसाला श्रद्धांजली वाहिली आहे. पंतप्रधानांनी ट्विटमध्ये लिहिले की, “कारगिल विजय दिवस हे भारती मातेच्या अभिमानाचे आणि गौरवाचे प्रतीक आहे. मातृभूमीच्या रक्षणासाठी पराक्रम गाजवणाऱ्या देशाच्या सर्व शूर सुपुत्रांना मी या निमित्ताने सलाम करतो. जय हिंद!''

या खास दिवशी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विटमध्ये लिहिले की, "कारगिल विजय दिवसानिमित्त, देश आपल्या सशस्त्र दलांच्या शौर्य, धैर्य आणि बलिदानाला सलाम करतो. आपल्या मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी त्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीत धैर्याने लढा दिला. त्यांचे शौर्य आणि अदम्य आत्मा भारताच्या इतिहासात नेहमीच एक निर्णायक क्षण म्हणून कोरले जाईल.

गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विटमध्ये लिहिले की, "कारगिल विजय दिवस हे भारतीय सशस्त्र दलाच्या अदम्य साहस आणि शौर्याचे प्रतीक आहे. आजचा दिवस अभिमान बाळगण्याचा आणि आपल्या सैनिकांच्या शौर्याचे स्मरण करण्याचा आणि सन्मान करण्याचा दिवस आहे. त्यांच्या शौर्याने कारगिलमधून शत्रूंना हुसकावून लावणार्‍या सैनिकांना मी सलाम करतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT