Pregnant Woman Yoga Viral Video Dainik Gomantak
देश

Pregnant Woman Viral Video: 9 महिन्यांची प्रेग्नन्सी आणि चक्रासन! महिलेचा थक्क करणारा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल

Pregnant Woman Yoga Viral Video: सोशल मीडियाच्या दुनियेत दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात, ज्यातील काही गोष्टींवर विश्वास ठेवणे कठीण होते.

Sameer Amunekar

सोशल मीडियाच्या दुनियेत दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात, ज्यातील काही गोष्टींवर विश्वास ठेवणे कठीण होते. सध्या असाच एक थक्क करणारा व्हिडिओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. बंगळुरू येथील एका नऊ महिन्यांच्या गरोदर महिलेने साडी नेसून चक्क कठीण योगासने केली आहेत. प्रसूतीचे दिवस अगदी जवळ आलेले असताना, म्हणजेच गरोदरपणाच्या ३९ व्या आठवड्यात या महिलेने दाखवलेली ही शारीरिक लवचिकता पाहून पाहणाऱ्यांचे डोळे पांढरे झाले आहेत. इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत २ कोटींपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले असून, यावरून नेटीझन्समध्ये एक वेगळीच चर्चा रंगली आहे.

कोण आहे ही महिला?

व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या या महिलेचे नाव शशी प्रभा द्विवेदी असून, त्या बंगळुरूमध्ये राहतात. त्या स्वतः एक व्यावसायिक योगा शिक्षिका (Yoga Teacher) आहेत. या व्हिडिओमध्ये त्यांनी एक सुंदर हिरवी साडी परिधान केली आहे. गरोदरपणाचा काळ शेवटच्या टप्प्यात असतानाही, त्यांनी अत्यंत सहजरीत्या 'चक्रासन' सारखे अतिशय अवघड आसन करून दाखवले आहे. हे आसन करत असताना त्यांच्या चेहऱ्यावर कोणतीही अडचण किंवा वेदना जाणवत नव्हती. त्यांच्या या आत्मविश्वासाने आणि ताकदीने लाखो लोकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

व्हिडिओ पाहून नेटीझन्समध्ये दोन गट; टीका आणि कौतुकाचा पाऊस

हा व्हिडिओ सोशल मीडियावर येताच युजर्समध्ये दोन तट पडले आहेत. एका बाजूला अनेक लोक या महिलेच्या शारीरिक क्षमतेचे आणि तिच्या आत्मविश्वासाचे कौतुक करत आहेत. एका आईची ही खरी ताकद असल्याचे समर्थकांचे म्हणणे आहे.

तर दुसऱ्या बाजूला, अनेक नेटीझन्सनी यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. केवळ सोशल मीडियावर प्रसिद्धी, व्ह्यूज आणि लाईक्स मिळवण्यासाठी गरोदरपणाच्या शेवटच्या दिवसांत असे धोकादायक स्टंट करणे अत्यंत बेजबाबदारपणाचे आहे, अशी टीका विरोधकांनी केली आहे. यामुळे पोटात वाढणाऱ्या बाळाच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो, अशी चिंताही अनेकांनी व्यक्त केली.

ट्रोलर्सना योगा शिक्षिकेने दिले सडेतोड उत्तर; दिला महत्त्वाचा सल्ला

वाढती टीका आणि ट्रोलिंग पाहता स्वतः शशी प्रभा यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. त्या म्हणाल्या की, "हे मी कोणत्याही प्रसिद्धीसाठी केलेले नाही. हे माझ्या अनेक वर्षांच्या कठोर परिश्रमाचे, नियमित सरावाचे आणि माझ्या शरीरावरील विश्वासाचे फळ आहे. ही माझी जीवनशैली आहे." यासोबतच त्यांनी महिलांना एक अत्यंत महत्त्वाचा सल्ला दिला आहे. त्यांनी सांगितले की, "प्रत्येक महिलेचा गरोदरपणाचा प्रवास हा वेगवेगळा असतो. त्यामुळे माझा हा व्हिडिओ पाहून कोणीही घरच्या घरी याची नक्कल (Copy) करण्याचा प्रयत्न करू नये. गरोदरपणात कोणताही व्यायाम किंवा योगासने करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत अनिवार्य आहे."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: व्यापाऱ्यांसाठी जॅकपॉट अन् नोकरदारांना पगारवाढ! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीची चांदीच चांदी; पैशांची चिंता कायमची मिटणार

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT