Prayagraj Wife Kills Husband Dainik Gomantak
देश

Crime News: लव्ह मॅरेज ते थेट खून! दारूच्या नशेत पतीने कानाखाली मारताच बायकोचा पारा चढला, दगडाने डोकं ठेचून नवऱ्याला संपवलं

Prayagraj Wife Kills Husband: उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे पती-पत्नीच्या वादातून धक्कादायक हत्या झाल्याची घटना समोर आली आहे.

Sameer Amunekar

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे पती-पत्नीच्या वादातून धक्कादायक हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. किरकोळ कारणावरून सुरू झालेल्या वादाचे रूपांतर इतके भयंकर झाले की, पत्नीने स्वतःच्या पतीची दगडाने ठेचून हत्या केली. पतीने वादादरम्यान पत्नीच्या कानशिलात लगावली होती. यामुळे संतापलेल्या पत्नीने जवळच पडलेला दगड उचलून पतीच्या डोक्यावर वार केले. या हल्ल्यात पतीचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली आहे. विशेष म्हणजे, या दोघांनी प्रेमविवाह केला होता. त्यांना एक मुलगाही आहे. मात्र, कौटुंबिक वादातून घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं? पती-पत्नीमध्ये कशावरून झाला वाद?

मिळालेल्या माहितीनुसार, ९ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास ३५ वर्षीय शेखर बंसल आणि त्याची पत्नी उर्मिला केवट यांच्यात काही कारणावरून वाद झाला. सुरुवातीला दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची सुरू होती. मात्र, काही वेळातच वाद वाढत गेला.

याचदरम्यान शेखरने पत्नी उर्मिला हिला थप्पड मारली. पतीने मारहाण केल्यामुळे संतप्त झालेल्या उर्मिलाने जवळच असलेला दगड उचलला आणि शेखरच्या डोक्यावर वार करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शेखरचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

प्रेमविवाहानंतरही घरात वारंवार व्हायचे वाद

पोलिसांच्या प्राथमिक तपासात शेखर आणि उर्मिला यांनी प्रेमविवाह केल्याची माहिती समोर आली आहे. दोघांना एक मुलगाही आहे. मात्र, शेखरला दारूचे व्यसन असल्याने पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत असल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. दारू पिऊन घरी आल्यानंतर होणाऱ्या वादांमुळे त्यांच्या वैवाहिक आयुष्यात तणाव निर्माण झाला होता. याच पार्श्वभूमीवर ९ नोव्हेंबर रोजी पुन्हा दोघांमध्ये वाद झाला आणि त्याचे रूपांतर हत्येत झाले. एका क्षणाच्या संतापातून घडलेल्या या घटनेमुळे कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.

पत्नीला अटक; न्यायालयीन कोठडीत रवानगी

या हत्येप्रकरणी शंकरगढ पोलीस ठाण्यात उर्मिला केवट हिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत ११ नोव्हेंबर रोजी तिला अटक केली. त्यानंतर आरोपी महिलेला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिला न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले आहेत.

घटनेचा व्हिडीओ पोलिसांच्या हाती

या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांच्या हाती घटनेशी संबंधित एक व्हिडीओही लागला आहे. पोलिसांनी हा व्हिडीओ महत्त्वाचा पुरावा म्हणून तपासात समाविष्ट केला आहे. या व्हिडीओसह इतर पुराव्यांच्या आधारे घटनेचा संपूर्ण घटनाक्रम समजून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. हत्या नेमकी कोणत्या परिस्थितीत झाली, यासह सर्व संबंधित बाबींचा पोलीस तपास करत आहेत. दरम्यान, प्रेमविवाह केलेल्या जोडप्याच्या संसाराचा अशा प्रकारे अंत झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Government Spending: गोव्यात 5 वर्षांत इव्हेंट-महोत्सवांवर 675 कोटींचा खर्च; जनतेच्या पैशांची उधळपट्टी केल्याचा दुर्गादास कामत यांचा आरोप

Mahadayi Project Forest Clearance: म्हादई प्रकल्पाला केंद्राचा मोठा अडथळा; कर्नाटकच्या 71 एकर वनजमीन मंजुरीचा प्रस्ताव यादीतून हटविला

Bengaluru Crime: बंगळूरुमध्ये दिवसाढवळ्या हत्याकांड! बायकोसमोर रिअल इस्टेट व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोरांनी साधला डाव

Goa Politics: मांद्रे मतदारसंघावर मगोचा दावा; 'युती झाली तर जागा आम्हालाच हवी', दीपक ढवळीकरांचे स्पष्ट विधान

IND vs NZ Test: न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी टीम इंडियात मोठा बदल! गुरनूर ब्रारची संघात एन्ट्री, कुलदीप यादव मायदेशी परतणार

SCROLL FOR NEXT