Prashant Kishor will be Congress new kingmaker? Dainik Gomantak
देश

प्रशांत किशोर आता होणार का काँग्रेसचे रणनीतीकार?

निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी पंजाब विधानसभा (Punjab Assembly Election ) निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग (Amarinder Singh) यांच्या 'मुख्य सल्लागार' पदाचा राजीनामा दिला आहे.

दैनिक गोमन्तक

निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी पंजाब विधानसभा (Punjab Assembly Election ) निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग (Amarinder Singh) यांच्या 'मुख्य सल्लागार' पदाचा राजीनामा दिला आहे. प्रशांत किशोर यांची याच वर्षी मुख्यमंत्री अमरिंदर यांचे 'प्रमुख सल्लागार' म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. नियुक्ती करण्यात आली. पंजाबमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. प्रशांत किशोर यांनी 2017 च्या पंजाब विधानसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसच्या(Congress) निवडणूक प्रचाराचा कार्यभार स्वीकारला होता. आणि काँग्रेसने या निवडणुकीत विजयही मिळवला होता. (Prashant Kishor will be Congress new kingmaker?)

सार्वजनिक जीवनात सक्रिय भूमिकेतून तात्पुरती रजा घेण्याचा माझा निर्णय पाहता, मी तुमचा 'मुख्य सल्लागार' म्हणून जबाबदाऱ्या हाताळू शकत नाही. मी तुम्हाला विनंती करतो की कृपया मला या जबाबदारीतून मुक्त करा.अशी विनंती करत प्रशांत किशोर यांनी आपला निरोप मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांना कळविला आहे.

यापूर्वी प्रशांत किशोर यांनी ते त्यांच्या I-PAC कंपनीत जास्त दिवस सक्रिय राहणार नाही असे सांगितले होते. त्यांनंतर त्यांनी दिल्लीत राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि सोनिया गांधी यांचीही भेट घेतली होती. त्यांच्या या भेटीनंतर देशाच्या राजकारणात अनेक चर्चा रंगल्या होत्या कारण काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या प्रशांत किशोर यांच्या प्रस्तावावर पक्षाच्या नेत्यांशी विचारमंथन केल असल्याचे बोलले जात होते.

त्यांच्या आगमनामुळे काँग्रेसला फायदा होईल, असा विश्वास बहुतेक काँग्रेस नेत्यांना होता. पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी यांनी 22 जुलै रोजी जी बैठक बोलावली होती त्याचा मुख्य अजेंडा प्रशांत किशोर पक्षात सामील झाल्यास त्यांना देण्यात येणाऱ्या भूमिकेवर चर्चा करणे आणि पक्षातील फायदे आणि तोटे यावर विचार करणे हा होता. मात्र,या विषयावर प्रशांत किशोर यांच्याकडून काहीच बोलले गेलेले नाही आणि काँग्रेसनेही अद्याप याबद्दल अधिकृतपणे काहीच सांगितले नाही.

2019 च्या लोकसभा निवडणुका झाल्यापासून, कॉंग्रेस पक्षाला नेतृत्वाच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. पक्षांतर्गत आणि पक्षाच्या बाहेर सुद्धा अनेक संकटांमधून काँग्रेस जात आहे. अशा परिस्थितीत, अनेकांचा असा विश्वास आहे की जर पीके पक्षासोबत आले तर 2024 मध्ये मोदी विरुद्ध राहुलच्या युद्धात काँग्रेसला फायदाच होईल.

त्याचवेळी, अनेक काँग्रेस नेते देखील चिंतित आहेत कारण प्रशांत किशोर यांचे यापूर्वी अनेक राजकीय पक्षांशी संबंध होते, त्यामुळे पीकेला पक्षात काय भूमिका मिळाली पाहिजे यावर मंथन चालू आहे. भूतकाळात प्रशांत किशोर यांची रणनीती अशी होती की त्यांनी संघटनेत आमूलाग्र बदल केले आणि नंतर पक्षाला नवी दिशा दिली. हेच कारण आहे की हे काही नेत्यांसाठी चिंतेचे कारण आहे .

दरम्यान एका ज्येष्ठ नेत्याच्या मते प्रशांत किशोर यांना काँग्रेसमध्ये सरचिटणीस पद मिळू शकते आणि निवडणूक रणनीतीची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या हातात येऊ शकते. पावसाळी अधिवेशनानंतर लवकरच प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करतील अशी अटकळ पक्षात आहे.मात्र, प्रशांत किशोर यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात येत आहे की, प्रशांत किशोर यांना अशा कोणत्याही ऑफरची माहिती नाही, किंवा ते कोणत्याही पदासाठी उत्सुक नाहीत. जे लोक प्रशांत किशोर यांचे काम जाणणाऱ्यांवर विश्वास ठेवला गेला तर प्रशांत किशोर आणि काँग्रेस यांच्यात कोणतेही संबंध तेंव्हाच निर्माण होतील जेव्हा पीकेला काम करण्यास आणि निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य काँग्रेसमध्ये दिले जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

SCROLL FOR NEXT