Police Raid In Ghaziabad Hotel Sex Racket Dainik Gomantak
देश

उत्तर प्रदेशात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; मुली म्हणाल्या, 'हॉटेल मालकाने आम्हाला...'

Police Raid In Ghaziabad Hotel Sex Racket: उत्तर प्रदेशात पोलिसांकडून हॉटेल्सवर सातत्याने छापे टाकण्यात येत आहेत.

Manish Jadhav

Police Raid In Ghaziabad Hotel Sex Racket: उत्तर प्रदेशात पोलिसांकडून हॉटेल्सवर सातत्याने छापे टाकण्यात येत आहेत. यातच शनिवारी गाझियाबादमधील एका हॉटेलवर छापा टाकल्यानंतर पोलिसांनी हॉटेलमध्ये सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट सुरु असल्याची माहिती मिळाली, त्यानंतर पोलिसांनी छापा टाकून एकूण पाच जणांना अटक केली.

पोलिसांच्या छापेमारीत मालक आणि व्यवस्थापकाला अटक

मिळालेल्या माहितीनुसार, हे संपूर्ण प्रकरण गाझियाबाद (Ghaziabad) जिल्ह्यातील इंदिरापुरम येथील नीती खांड भागातील आहे. शनिवारी या भागातील एका हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट सुरु असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ पोलिसांच्या पथकासह छापा टाकला, त्यानंतर हॉटेल मालक आणि व्यवस्थापकासह पाच जणांना अटक करण्यात आली. हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट होते.

छाप्यात हॉटेलमध्ये आक्षेपार्ह वस्तू सापडल्या

या छाप्याबाबत सहाय्यक पोलिस (Police) आयुक्त भास्कर वर्मा यांनी सांगितले की, गुरुवारी रात्री उशिरा सेक्स रॅकेट चालवल्याची गुप्त माहिती मिळाली, त्यानंतर पोलिसांच्या पथकाने छापा टाकला.

या छाप्यादरम्यान पोलिसांनी हॉटेल मालक सचिन शर्मा आणि हॉटेल व्यवस्थापक अमित कुमार तसेच हॉटेलमधील तीन संशयित ग्राहकांना अटक केली. एवढेच नाही तर घटनास्थळावरुन पोलिसांच्या पथकाने आक्षेपार्ह वस्तूही जप्त केल्या आहेत.

5 मुली ताब्यात, म्हणाल्या- हॉटेल मालकाने त्यांना वेश्याव्यवसायास भाग पाडले

यासोबतच सहाय्यक पोलिस आयुक्तांनी असेही सांगितले की, छाप्यादरम्यान पोलिसांनी नोएडा, गाझियाबाद आणि दिल्ली येथून पाच मुलींनाही ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी सापडलेले हॉटेलचे रजिस्टर आणि मोबाईल फोनही पोलिसांनी जप्त केला आहे.

सचिन शर्मा याने दोन वर्षांपूर्वी हे हॉटेल भाड्याने घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याचवेळी, पोलीस कोठडीत आलेल्या मुलींनी पोलिसांना सांगितले की, हॉटेल मालक सचिन शर्मा आणि मॅनेजर अमित यांनी त्यांना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT