Viral Video Dainik Gomantak
देश

Watch: भोपाळच्या रस्त्यावर पोलिसाचं कांड, तरुणीची छेड काढताना दिसला; VIDEO व्हायरल होताच...

Manish Jadhav

Madhya Pradesh: मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये मध्यरात्री एका सुनसान रस्त्यावर एका पोलिस हवालदाराने एका तरुणीला त्रास दिल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये हवालदार बाईकवर बसला असून समोर उभ्या असलेल्या तरुणीसोबत गैरवर्तन करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर पोलीस हवालदाराला लाईनवर जोडण्यात आले.

हवालदाराचा तरुणीशी वाद

हे प्रकरण भोपाळ (Bhopal) रेल्वे स्थानकाजवळ असल्याचे सांगितले जात आहे. जिथे होळीच्या दोन दिवस आधी, सकाळी 11 वाजता कोहेफिजा पोलिस स्टेशनमध्ये तैनात असलेले पुष्पेंद्र सिंह त्यांच्या दुचाकीवर बसलेले दिसतात. त्यांचा समोरच्या मुलीशी वाद सुरु आहे.

दोघांमध्ये बाचाबाची झाली, त्यानंतर मुलगी हवालदारावर रागावून निघून जाते. या व्हायरल व्हिडीओमध्ये तरुणीचा कॉन्स्टेबलकडून छळ होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसाची कोंडी झाली

व्हायरल व्हिडिओ समोर येताच पोलिसाची (Police) चांगलीच तारांबळ उडाली. या आक्षेपार्ह व्हायरल व्हिडिओमुळे उच्च पोलीस अधिकाऱ्याने तात्काळ कारवाई केली. कॉन्स्टेबलला लाइनशी जोडण्यात आले आहे, ज्यामध्ये तो गणवेशात दिसत आहे. मात्र, मुलीच्या वतीने कोणताही गुन्हा किंवा तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.

'अनुचित घटनेच्या भीतीने मुलीला निघून जाण्यास सांगितले'

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हिडिओमध्ये दिसणारी तरुणी कोहेफिजा पोलिस स्टेशनचे कॉन्स्टेबल पुष्पेंद्र यांची मैत्रीण होती.

पुष्पेंद्र या भागातून जात असताना वाटेत एक महिला मैत्रिण मद्यधुंद अवस्थेत दिसली, तिला नीट चालता येत नव्हते, त्यामुळे अनुचित प्रकाराच्या भीतीने त्याला तिला घरी सोडायचे होते, त्याच दरम्यान कोणीतरी त्याचा व्हिडिओ बनवला.

पोलिस कर्मचाऱ्याच्या या व्हिडिओवर यूजर्सने प्रतिक्रिया दिली आहे

पोलिस कर्मचाऱ्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला. एका सोशल मीडिया वापरकर्त्याने लिहिले की, भारतात पोलिसही रस्त्यावर महिलांशी गैरवर्तन करताना दिसतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arjun Tendulkar: क्रिकेटच्या देवाचा मुलगा चमकला, कर्नाटक संघाचे कंबरडे मोडले; गोव्याला मिळवून दिला मोठा विजय

Hit and Run Case: पेडणे हिट अँड रन प्रकरणातील फरार ट्रकचालकाला अटक

Mumbai Goa Highway Accident: मालवणमधून कोल्हापूर - तुळजापूरला जाणाऱ्या एसटी बसचा अपघात, 26 प्रवासी जखमी

Whirlwind at Arambol Beach: हरमल समुद्रकिनारी अचानक वावटळीची धडक; काही स्टॉल्सचे नुकसान

Goa Fishing: कर्नाटकातील मच्छीमारांची घुसखोरी, गोव्यातून होतोय तीव्र विरोध

SCROLL FOR NEXT