PM Dainik Gomantak
देश

पंतप्रधानांचे ट्विटर अकाऊंट हॅक!

हॅकर्सनी बिटकॉईनबाबत केलेल्या ट्विटमुळे ट्विटरवर खळबळ उडाली आहे. मात्र, पीएम मोदींचे (PM) ट्विटर हँडल सुरक्षित करण्यात आल्याची माहिती पीएमओने नंतर माध्यमांना दिली.

दैनिक गोमन्तक

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे ट्विटर अकाऊंट शनिवारी मध्य रात्री हॅकर्सनी हॅक केले आणि बिटकॉइनशी संबंधित एक ट्विट केल्याने लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. मात्र, लवकरच हे ट्विट पीएम मोदी (@narendramodi) यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून हटवण्यात आले आणि आता त्यांचे ट्विटर हँडल पूर्णपणे सुरक्षित करण्यात आले आहे. हॅकर्सनी ट्विट करून लिहिले की, भारताने बिटकॉइनला कायदेशीर मान्यता दिली आहे.

केंद्र सरकारने (Central Government) भारतात क्रिप्टोकरन्सीला कायदेशीर मान्यता दिलेली नाही. अशा स्थितीत हॅकर्सनी बिटकॉईनबाबत केलेल्या ट्विटमुळे ट्विटरवर खळबळ उडाली आहे. मात्र, पीएम मोदींचे (PM) ट्विटर हँडल सुरक्षित करण्यात आल्याची माहिती पीएमओने नंतर माध्यमांना दिली.

हॅकर्सनी पीएम मोदींच्या ट्विटर हँडलवरून दोन ट्विट केले. पहिले ट्विट शनिवारी रात्री 2:11 वाजता आले, ज्यात म्हटले होते, 'भारताने बिटकॉइनला (Bitcoin) अधिकृतपणे कायदेशीर मान्यता दिली आहे. सरकारने 500 BTC विकत घेतले आहेत आणि ते सामान्य लोकांमध्ये वितरित केले जात आहेत. भारत लवकर करा...भविष्य आज आले आहे!’ हे ट्विट पीएम मोदींच्या ट्विटर हँडलवर दोन मिनिटे राहिले आणि नंतर हटवले गेले होते.

दुसरे ट्विट केवळ 3 मिनिटांच्या अंतराने म्हणजेच 2.14 वाजता केले गेले, ज्यामध्ये आधीच्या ट्विट मध्ये जे शब्द होते तेच पुन्हा सांगण्यात आहे. मात्र काही मिनिटांत तेही हटवण्यात आले. मात्र, तोपर्यंत पीएम मोदींच्या ट्विटर अकाउंटवरून ट्विटरवर केलेल्या या ट्विटचे स्क्रीनशॉट व्हायरल झाले होते.

PM

पंतप्रधानांचे अधिकृत ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याची माहिती देताना पीएमओने सांगितले की, पीएम मोदींच्या ट्विटर अकाऊंटशी छेडछाड करण्यात आली होती, ती लगेच दुरुस्त करण्यात आली. याबाबत ट्विटरनेही माहिती दिली आहे. पीएमओने सांगितले की, यावेळी पीएम मोदींच्या अकाऊंटवरून केलेल्या ट्विटकडे दुर्लक्ष करा.

2020 मध्ये, पंतप्रधान मोदींच्या वैयक्तिक वेबसाइटचे अधिकृत ट्विटर खाते (@narendramodi_in) देखील हॅक झाले होते. त्यादरम्यान बिटकॉइनच्या माध्यमातून कोरोना रिलीफ फंडात देणगी दिल्याची चर्चा होती. मात्र, त्यादरम्यानही हॅकर्सचे ट्विट तात्काळ डिलीट करून खाते सुरक्षित करण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT