PM Narendra Modi will address to UNSC today Dainik Gomantak
देश

UNSCची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आज संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या (UNSC) सागरी सुरक्षेवर खुल्या चर्चेचे अध्यक्षत्व करणार आहेत.

दैनिक गोमन्तक

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आज संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या (UNSC) सागरी सुरक्षेवर खुल्या चर्चेचे अध्यक्षत्व करणार आहेत. या बैठकीची थीम 'एन्हान्सिंग मरीटाईम सिक्युरिटी - 'अ मॅटर फॉर द मेन्टेनन्स ऑफ इंटरनॅशनल पीस अँड सिक्युरिटी'. अशी असणार आहे. (PM Narendra Modi will address to UNSC today)

पंतप्रधान कार्यालयाने (PMO) एका निवेदनात म्हटले आहे की, यूएनएसी सदस्य देशांचे राज्य प्रमुख आणि सरकार या चर्चेत सहभागी होण्याची शक्यता आहे. संयुक्त राष्ट्रसंघ आणि प्रमुख प्रादेशिक संघटनांचे अधिकारीही यात सहभागी होण्याची अपेक्षा आहे. पीएमओने म्हटले, "संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या खुल्या चर्चेचे अध्यक्ष असलेले नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान असतील."

पीएमओने म्हटले आहे की यूएनएससीने आतापर्यंत अनेकदा सागरी सुरक्षा आणि सागरी गुन्हेगारीच्या विविध पैलूंवर चर्चा केली आहे आणि अनेक ठराव देखील पारित केले आहेत. मात्र , सागरी सुरक्षेवर उच्चस्तरीय आणि खुली चर्चा सखोल पद्धतीने होण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. "कोणताही देश सागरी सुरक्षेच्या विविध पैलूंबद्दल चिंता करू शकत नाही, त्यामुळे त्याला यूएनएससीमध्ये व्यापक विषय म्हणून पुढे नेणे महत्त्वाचे असल्याचे पीएमओ तर्फे सांगण्यात येत आहे.

सागरी सुरक्षेचा एक व्यापक दृष्टीकोन असावा, जो वैध सागरी व्यवहारांचे संरक्षण करू शकतो तसेच सागरी क्षेत्रासाठी पारंपारिक आणि अपारंपरिक धोक्यांना सामोरे जाऊ शकतो.भारताने 1 ऑगस्टपासून ही जबाबदारी स्वीकारली आहे. यूएनएससीमध्ये अमेरिका, चीन, ब्रिटन, रशिया आणि फ्रान्सचे केवळ पाच कायम सदस्य आहेत. सध्या भारत सुरक्षा परिषदेचा दोन वर्षांसाठी कायम नसलेला सदस्य आहे.तसेच, भारत बऱ्याच काळापासून सुरक्षा परिषदेत कायमस्वरुपी सदस्य होण्याचा दावा करत आहे. भारताशिवाय जगातील इतर सर्व देश देखील संयुक्त राष्ट्रांच्या सुधारणेसह सुरक्षा परिषदेत कायम सदस्यांची संख्या वाढवण्याची मागणी करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Record: 22 षटकार, 17 चौकार… टी20 क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक', 140 किलो वजनाच्या खेळाडूनं घातला धुमाकूळ; गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या

Strait of Hormuz: इराणचा अमेरिकेला 'डिजिटल' दणका! होर्मुजच्या सामुद्रधुनीतील इंटरनेट केबल्सवर नियंत्रण मिळवण्याची तयारी; जागतिक दळणवळण धोक्यात

Shani Gochar 2026: शनीदेवाचा रेवती नक्षत्रात धमाका! 2 जुलैपासून 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; उत्पन्नात होणार मोठी वाढ

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

SCROLL FOR NEXT