PM Modi  Twitter
देश

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वीकारला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार

पंतप्रधान नरेंद्र मोदींना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सन्मानित करण्यात आले.

दैनिक गोमन्तक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना (PM Narendra Modi) यांना पहिला लता मंगेशकर पुरस्कार (Lata Mangeshkar Award) जाहीर झाला आहे. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी नरेंद्र मोदी आज मुंबईत आले. मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात हा पुरस्कार सोहळा पार पडला. (PM Narendra Modi recived first Lata dinanath mangeshkar award)

मोदींना पहिला लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. लता मंगेशकर पुरस्कार सोहळा मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात पार पडला. या कार्यक्रमाचं उद्घाटनं मोदींच्या (PM Modi) हस्ते करण्यात आले. उषा मंगेशकर यांनी लता मंगशकरांच्या आठवणींना उजाळा देवून उपस्थित सर्वांचे आभार मानले.

या कार्यक्रमाला मंगेशकर कुटुंबियांपैकी आशा भोसले, उषा मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर हे उपस्थित आहेत. याशिवाय राज्यपाल भगतसिंग कोश्यारी,राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला अनुपस्थित होते.

या वर्षाच्या सुरुवातीला वयाच्या 92 व्या वर्षी मुंबईत निधन झालेल्या दिग्गज गायकाच्या स्मरणार्थ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान चॅरिटेबल ट्रस्टने एका निवेदनात म्हटले की हा पुरस्कार दरवर्षी "आपल्या राष्ट्रासाठी, तेथील लोकांसाठी आणि समाजासाठी अतुलनीय, नेत्रदीपक आणि अनुकरणीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना दिला जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Baina Beach: बायणा किनारा 30 वर्षांसाठी भाड्याने देण्याचा प्रस्ताव रद्द; स्थानिकांच्या विरोधाला यश

भारतासाठी टेन्शन फ्री बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियन तेल खरेदीवरील कडक निर्बंध हटवले; 100 टक्के टॅरिफचा धोका टळला

Smart Meter Scheme: स्मार्ट वीज मीटरवर मानवाधिकार आयोगाचा हिरवा कंदील; तरी गोव्यात योजना तूर्तास स्थगितच

Horoscope: नवरात्रीच्या सातव्या दिवशी देवी कालरात्रीची कृपा! मेष ते मीन, 12 राशींचे आजचे राशिभविष्य; कोणाला मिळणार धनलाभ?

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

SCROLL FOR NEXT