PM Narendra Modi Dainik Gomantak
देश

''GYAN वर लक्ष केंद्रित करा...'', PM मोदींनी सांगितला विकसित भारताचा फॉर्म्यूला

PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याला 100 वर्षे पूर्ण होईपर्यंत म्हणजेच 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचे वचन दिले आहे.

Manish Jadhav

PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याला 100 वर्षे पूर्ण होईपर्यंत म्हणजेच 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचे वचन दिले आहे. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधानांनी त्यांचा संकल्प पूर्ण करण्याचे सूत्र देखील स्पष्टपणे सांगितले. GYAN वर लक्ष केंद्रित करा आणि GYAN चा आदर करुनच भारत विकसित होईल, असे पंतप्रधान म्हणाले. त्यांचे सूत्र डीकोड करताना पंतप्रधानांनी सांगितले की, येथे GYAN मध्ये G म्हणजे गरीब, Y म्हणजे तरुण, A म्हणजे अन्नदाता म्हणजे शेतकरी आणि N म्हणजे नारी म्हणजे महिला.

पीएम मोदी म्हणाले की, ''जर आपण बारकाईने पाहिले तर आजच्या काळात ऐतिहासिक साम्य आहे. शंभर वर्षांपूर्वी स्वातंत्र्याची आशा होती. 1922 ते 1947 या काळात प्रत्येकाला स्वातंत्र्य चळवळीत हातभार लावायचा होता. काहींनी खादी विणून हातभार लावला, तर काहींनी विविध चळवळींमध्ये भाग घेऊन, जमेल त्या पद्धतीने योगदान दिले. पुढील 25 वर्षे देशासाठी महत्त्वाची आहेत. स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण होईपर्यंत भारताला विकसित देश बनवण्याची आशा आणि अपेक्षा मला लोकांमध्ये दिसत आहे. ही ऊर्जा माझी प्रेरणा आहे.''

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, ''2047 पर्यंत देशाला विकसित करण्यासाठी, तरुणांना चांगले आरोग्य आणि फिटनेस प्रदान करणे आणि त्यांना योग्य कौशल्याने सुसज्ज करणे हे माझे सर्वात मोठे ध्येय असेल. कौशल्य विकासाची सुरुवात शाळेमधून होते, जिथे प्रत्येक वर्गात तरुण मनांना नाविन्यपूर्ण विचार करण्यासाठी आणि समस्यांवर उपाय शोधण्यासाठी तयार केले जाते. अशाप्रकारे, नवीन शिक्षण प्रणालीद्वारे, आम्ही एक अशी प्रणाली विकसित करत आहोत जी मुलांना 21 व्या शतकातील आव्हानांना तोंड देण्यासाठी तयार करते, अशी प्रणाली जी त्यांना अडथळ्यांना संधींमध्ये रुपांतरित करण्यास शिकवते.''

उद्योग आणि गुंतवणुकीबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, ''लहान आणि मध्यम उद्योगांना पाठिंबा आणि प्रोत्साहन देणे आणि त्यांची उत्पादकता सुधारणे यास आमचे प्राधान्य आहे. मोठ्या प्रमाणावर उच्च-उत्पादकता आणि उच्च वेतनाच्या नोकऱ्या निर्माण करण्यासाठी या उद्योगांना वाढवणे आवश्यक आहे. आम्ही त्यांना भांडवल, तंत्रज्ञान, अधिक संधी आणि नियमांमध्ये शिथिलता मिळवून देण्यासाठी काम करत आहोत.''

पीएम मोदी पुढे असेही म्हणाले की, ''2047 पर्यंत 'विकसित देश'चा दर्जा प्राप्त करण्याचे उद्दिष्ट असलेल्या भारताला विविध आणि नाविन्यपूर्ण स्त्रोतांद्वारे गुंतवणूकीसाठी वित्तपुरवठा करणे आवश्यक आहे. कौशल्य, क्षमता आणि नियामक चौकटीच्या दृष्टीने देशाचे वित्तीय क्षेत्र आणि भांडवली बाजार तयार करणे, जेणेकरुन ते देशाच्या गुंतवणुकीच्या गरजा पूर्ण करु शकतील, ही माझ्यासाठी प्रमुख प्राथमिकता आहे. देशातील व्यवसाय सुलभतेच्या गरजांशिवाय देशाची निर्यात स्पर्धात्मक करण्यावर आम्ही भर देणार आहोत. हे नवकल्पना आणि आर्थिकदृष्ट्या अत्याधुनिक उत्पादनास प्रोत्साहन देईल.'' पंतप्रधान शेवटी म्हणाले की, 'प्रशासनातील सुधारणा माझ्या हृदयाच्या जवळ विषय आहेत. उत्तरदायित्व आणि क्षमता निर्माण हे प्रभावी प्रशासनाचे दोन स्तंभ आहेत ज्यांना आम्ही बळकट करु.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT