PM Modi Dainik Gomantak
देश

Gujarat Morbi Bridge Collapse: मोरबी पूल दुर्घटनेबाबत PM मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक

Gujarat Morbi Bridge Collapse: मोरबी केबल पूल दुर्घटनेमुळे संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे.

दैनिक गोमन्तक

Gujarat Morbi Bridge Collapse: मोरबी केबल पूल दुर्घटनेमुळे संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. पूल कोसळल्यामुळे आतापर्यंत एकूण 141 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर या अपघातामुळे शेकडो लोक जखमीही झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात दौऱ्यावर आहेत. गुजरातमधील गांधीनगर येथील घटनेचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान मोदींनी आज उच्चस्तरीय बैठक घेतली.

दरम्यान, बैठकीत पंतप्रधान मोदींना मोरबी येथील दुर्घटनेनंतर सुरु असलेल्या बचाव आणि मदत कार्याची माहिती देण्यात आली. यासोबतच केबल पूल दुर्घटनेशी संबंधित सर्व बाबींवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीत पीएम मोदींनी बाधित लोकांना शक्य ती सर्व मदत मिळावी यावर भर दिला.

दुसरीकडे, या उच्चस्तरीय बैठकीत मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, गृह राज्यमंत्री हर्ष संघवी, गुजरातचे (Gujarat) मुख्य सचिव आणि डीजीपी यांच्यासह राज्याचे गृह विभाग आणि गुजरात राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे उच्च अधिकारी उपस्थित होते. केबल पूल कोसळून 141 जणांचा मृत्यू झाला, तर 100 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) गुजरातमधील केवडिया येथे पोहोचले होते. सोमवारी त्यांनी ‘लोहपुरुष’ यांना पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. त्याचवेळी भाषण करताना मोरबी पूल दुर्घटनेबद्दल ते भावूक झाले. त्यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले. तसेच बचाव कार्य आणि सरकारच्या प्रयत्नांची माहिती दिली. या अपघाताबाबत पंतप्रधान मोदींनी गांधीनगरमध्ये (Gandhinagar) उच्चस्तरीय बैठकही घेतली.

सैन्याने कमांड घेतली

काल म्हणजेच 30 ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा मोरबी येथे केबल पूल तुटला. रात्री साडेनऊपर्यंत ध्रंगधरा, जामनगर, भुज येथून लष्कराच्या नऊ तुकड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या. लष्कराच्या या तुकड्यांमध्ये इंजिनीअरिंग टास्क फोर्स आणि मेडिकल डिटेचमेंटमधील जवानांचा समावेश आहे. घटनास्थळी पोहोचल्यानंतर जवानांनी गर्दीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली. लष्कराच्या जवानांच्या मदतीने सर्व जखमींना रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले.

मुख्यमंत्र्यांनी भरपाई जाहीर केली

या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. हा पूल सुमारे 100 वर्षे जुना असल्याचे सांगण्यात येत असून काही दिवसांपूर्वी त्याची दुरुस्ती करण्यात आली होती. दुरुस्तीच्या केवळ 5 दिवस आधी ते सामान्यांसाठी पुन्हा खुले करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT