Dabang Delhi Dainik Gomantak
देश

Pro Kabaddi League Final 2025: दबंग दिल्ली पुन्हा कबड्डी 'चॅम्पियन'! जिंकला PKL 12चा किताब; फायनलमध्ये पुणेरी पलटनची कडवी झुंज अपयशी

Dabang Delhi Vs Puneri Paltan: जवळपास दोन महिने चाललेल्या आणि विक्रमी कामगिरीने गाजलेल्या प्रो कबड्डी लीग (PKL) च्या 12व्या सीझनचा थरार अखेर संपला.

Manish Jadhav

Pro Kabaddi League Final 2025: जवळपास दोन महिने चाललेल्या आणि विक्रमी कामगिरीने गाजलेल्या प्रो कबड्डी लीग (PKL) च्या 12व्या सीझनचा थरार अखेर संपला. आज, 31 ऑक्टोबर 2025 रोजी नवी दिल्लीतील त्यागराज स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात दबंग दिल्ली केसी संघाने पुणेरी पलटनचा (Puneri Paltan) 2 गुणांनी पराभव करत दुसऱ्यांदा PKL चे विजेतेपद पटकावले.

रोमहर्षक अंतिम लढत

दरम्यान, हा अंतिम सामना अपेक्षेप्रमाणेच रोमहर्षक झाला. दोन्ही संघांनी संपूर्ण सीझनमध्ये जबरदस्त प्रदर्शन केले आणि अंतिम फेरीतही दोन्ही संघांनी शेवटच्या क्षणापर्यंत कडवी झुंज दिली.

  • विजेता संघ: दबंग दिल्ली केसी

  • उपविजेता संघ: पुणेरी पलटन

  • अंतिम स्कोअर: दबंग दिल्ली 30- 28 पुणेरी पलटन

अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात दबंग दिल्लीने 2 गुणांच्या फरकाने विजय मिळवला आणि चार वर्षांनंतर पुन्हा एकदा PKL ची ट्रॉफी जिंकण्यात यश मिळवले. यापूर्वी दबंग दिल्लीने सीझन 8 मध्ये विजेतेपद पटकावले होते.

दिल्लीचा 'दबंग' जबरदस्त

दबंग दिल्लीच्या खेळाडूंनी महत्त्वपूर्ण क्षणी शानदार रेड आणि जबरदस्त टॅकल करत पुनेरी पलटनला यश मिळवू दिले नाही. दोन्ही संघांना इतिहास रचण्याची संधी होती, पण दिल्लीच्या संघाने आपल्या अनुभवाच्या जोरावर बाजी मारली आणि PKL 12 चा किताब आपल्या नावावर केला. या विजयामुळे दबंग दिल्लीच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, तर पुणेरी पलटनला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

दबंग दिल्लीचा दुसरा किताब

दबंग दिल्लीच्या संघाने अत्यंत शांतपणे आणि प्रभावीपणे खेळ करत पुणेरी पलटनला यश मिळवू दिले नाही. या विजयासह दबंग दिल्लीने PKL चा आपला दुसरा किताब जिंकला. दबंग दिल्लीचा संघ चार वर्षांनंतर पुन्हा एकदा ट्रॉफी जिंकण्यात यशस्वी झाला.

  • पहिला किताब: दबंग दिल्लीने यापूर्वी 2021-22 मध्ये पाटणा पायरेट्सला (Patna Pirates) हरवून आपले पहिले विजेतेपद जिंकले होते.

  • पुणेरी पलटनचा इतिहास: तर उपविजेता ठरलेल्या पुणेरी पलटनने गेल्या सीझनमध्ये म्हणजेच 2023-24 मध्ये हरियाणा स्टीलर्सला हरवून किताब जिंकला होता.

या अंतिम सामन्यात दबंग दिल्लीने पुण्याच्या संघाला अगदी थोड्या फरकाने हरवून आपला दबदबा सिद्ध केला आणि 12व्या सीझनचे विजेतेपद आपल्या नावावर केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karvi Flowers: श्री गणेशाने हत्तीचे रूप घेतले, मुरुगन आणि वल्लीचे लग्न झाले; गोव्यात फुलणाऱ्या 'कारवी'चे महत्व

ड्रग्ज का दारुची नशा? झिंगलेल्या रशियन महिलेचा शिवोलीत भररस्त्यात राडा, वाहनं अडवली, पोलिसांशी घातली हुज्जत

Goa Rain: तुळशीच्या लग्नाला 'पावसाच्या' अक्षता? शेतकरी हवालदिल; ‘व्हडली दिवाळी’वर पावसाचे सावट

Goa Today's News Live: गोव्यात मान्सूनोत्तर पावसाचा कहर, साखळीत वाळंवटी नदीला पूर

FIDE World Cup: फिडे विश्वकरंडक बुद्धिबळ स्पर्धेचे शानदार उद्‍घाटन! 82 देशांतील 206 खेळाडूंचा सहभाग

SCROLL FOR NEXT