Allahabad High Court 
देश

प्रेमप्रकरणातून झालेल्या शारीरिक संबंधाला बलात्कार मानता येणार नाही - अलाहाबाद HC

दुबईवरून आल्यानंतर प्रमीने लग्नाला नकार दिला होता.

Pramod Yadav

Allahabad High Court: काही कारणास्तव लग्नाला नकार दिला तरी दीर्घकालीन प्रेमप्रकरणातून निर्माण झालेले शारीरिक संबंधांना बलात्कार मानले जाऊ शकत नाही. असा महत्वपूर्ण निर्णय अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे.

प्रेयसीवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या प्रियकराविरुद्ध कनिष्ठ न्यायालयात सुरू असलेली फौजदारी कारवाईही उच्च न्यायालयाने रद्द केली आहे.

आरोपी झियाउल्लाच्या वतीने न्यायमूर्ती अनीस कुमार गुप्ता यांनी कनिष्ठ न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्राला आव्हान देणारी याचिका प्रकरणात न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

2008 मध्ये ही घटना घडली होती. गोरखपूरमध्ये बहिणीच्या लग्नात एका तरुणीची भेट एका तरुणासोबत झाली होती. दोघांमध्ये प्रेम भावना निर्णाण झाल्या आणि कुटुंबीयांच्या संमतीने मुलीचा प्रियकर जियाउल्ला तिला भेटण्यासाठी गोरखपूरहून ये-जा करत होता. 2013 मध्ये दोघांमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित झाले.

पण दरम्यानच्या काळात जियाउल्लाच्या कुटुंबीयांनी त्याला पैसे कमवण्यासाठी सौदी अरेबियाला पाठवल्याचा आरोप प्रेयसीने केला आहे. जियाउल्ला परत आल्यावर त्याने लग्नास नकार दिला. यानंतर प्रेयसीने महिला पोलिस ठाण्यात प्रियकराविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

जेव्हा शारीरिक संबंध झाले तेव्हा तरुणी प्रौढ होती आणि तिने स्वतःच्या इच्छेने नातेसंबंध जोडले होते. लग्नास नकार दिल्याने मुलावर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे याचिकाकर्त्याच्या वकिलाने न्यायालयात सांगितले.

वकिलांचा युक्तिवाद आणि पीडितेचे म्हणणे ग्राह्य धरून न्यायालयाने जियाउल्लाविरुद्ध दाखल केलेले पोलिस आरोपपत्र रद्द करण्यात आले आहे. काही कारणास्तव लग्नाला नकार दिला तरी, दीर्घकालीन प्रेमप्रकरणात निर्माण झालेले शारीरिक संबंध हे बलात्कार मानले जाऊ शकत नाहीत, असे न्यायालयाने म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway वर भीषण अपघात! भरधाव कारनं दोन अल्पवयीन मुलींना उडवलं, दोघींचीही प्रकृती गंभीर Watch Video

'धुरंधर' स्टाईल फायरींगनं हादरला पाकिस्तान! जैश-ए-मोहम्मदच्या बड्या कमांडरचा खेळ खल्लास; अज्ञात बंदूकधाऱ्यांनं काढला काटा VIDEO

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

Terrorist Secret Communication: गुप्त संवादासाठी अश्लील संकेतस्थळांचा वापर, दहशतवाद्यांची नवीन कार्यपद्धती; सोशल मीडियाला शोधला नवीन पर्याय

SCROLL FOR NEXT