Photographer, daughter die after his e-scooter explodes in Tamil Nadu; pic surfaces  Dainik Gomantak
देश

ई-स्कूटरचा स्फोट, श्वास गुदमरून बापलेकीचा मृत्यू

बॅटरी जास्त चार्ज झाल्यामुळे स्फोट

दैनिक गोमन्तक

वेल्लोरमध्ये शनिवारी इलेक्ट्रिक स्कूटरच्या स्फोटात वडील आणि त्यांची मुलगी ठार झाली. इलेक्ट्रिक स्कूटरला त्यांच्या घरी चार्ज करत असताना हा स्फोट झाला. वृत्तानुसार, मृतांची ओळख दुरई वर्मा, 49 वर्षीय छायाचित्रकार आणि तिरुवन्नमलाई सरकारी शाळेची विद्यार्थिनी मोहना प्रीती अशी आहे.

दुरई वर्मा यांनी दोन दिवसांपूर्वी तिरुवनमलाई इलेक्ट्रिक स्कूटर (e-scooter) खरेदी केली आणि ते स्कूटर वापरत होते. शुक्रवारी बॅटरी डाऊन झाल्याने त्यांनी स्कूटर चार्ज करण्याचा प्रयत्न केला. (Photographer, daughter die after his e-scooter explodes in Tamil Nadu; pic surfaces)

थोडावेळ बॅटरी चार्ज केल्यानंतर दोघे पुन्हा एकदा स्कूटर बघायला आले. मात्र, स्कूटरमधील बॅटरीचा अचानक स्फोट झाला. आणि स्फोटाची आग इतर दोन वाहनांमध्ये पसरली. शेजारी उभ्या असलेल्या दोघांनी घरात धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी स्वत:ला बाथरूममध्ये कोंडून घेतले. तरीही आग घरभर पसरली आणि काही मिनिटांतच दोघांचाही श्वास गुदमरून मृत्यू (Death) झाला. शेजाऱ्यांनी आग विझवण्यासाठी धाव घेतली मात्र आग आटोक्यात आली नाही, त्यामुळे त्यांनी अग्निशमन व बचाव विभागाला मदतीसाठी बोलावले. काही वेळातच जवानांनी घटनास्थळ गाठून आग विझवली.

त्यानंतर जवानांनी दोघांचे मृतदेह बाहेर काढले आणि शवविच्छेदनासाठी तिरुवन्नमलाई सरकारी (Government) रुग्णालयात (Hospital) पाठवले. बॅटरी जास्त चार्ज झाल्यामुळे हा स्फोट झाला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

National Security Act: 'सत्ताधारी पक्ष गोवा संपवायला निघालेत'! चोडणकरांचा आरोपच ‘रासुका’ दबाव आणण्यासाठी लागू केल्याचा दावा

Vande Mataram 150th Anniversary: ‘विकसित भारत 2047 ’च्या स्वप्नासाठी जगा', CM सावंतांचे तरुणांना आवाहन; ‘वंदे मातरम्’ स्मरणोत्सव साजरा

Goa Today's News Live: 'पाकिस्तान झिंदाबाद' फलक प्रकरणी बजरंग दल आक्रमक; तक्रार दाखल

'गोवा गुन्हेगारांसाठी आश्रयस्थान, नागरिकांसाठी मात्र असुरक्षित', LOP युरींचे टीकास्त्र; कायदा व सुव्यवस्था विषयावर अधिवेशन बोलवण्याची मागणी

Goa ZP Election: आरक्षित मतदारसंघांची यादी जाहीर! कवळेकर समर्थकांना धक्‍का, काब्राल समर्थकाला दिलासा; फोंड्यात महिलाराज

SCROLL FOR NEXT