Benazir Bhutto Dainik Gomantak
देश

Kerala Politics: केरळच्या राजकारणात भूकंप, बेनझीर भुट्टोंच्या पोस्टरवरुन नवा वाद पेटला

CPM News: केरळमध्ये पुन्हा एकदा नवा वाद निर्माण झाला आहे. आता या वादामध्ये देशातील कोणताही मुद्दा नाही.

दैनिक गोमन्तक

CPM News: केरळमध्ये पुन्हा एकदा नवा वाद निर्माण झाला आहे. आता या वादामध्ये देशातील कोणताही मुद्दा नाही. मग तुम्ही विचार करत असाल की, हा असा कोणता मुद्दा आहे, ज्याने केरळच्या राजकीय रणांगणात वादगं निर्माण केला आहे. होय, हा मुद्दा पाकिस्तानच्या माजी महिला पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांच्यासंबंधीचा आहे.

दरम्यान, केरळची (Kerala) राजधानी तिरुअनंतपुरममध्ये CPM (ऑल इंडिया डेमोक्रॅटिक वुमेन्स असोसिएशन) च्या महिला विंगने आयोजित केलेल्या कार्यक्रमापूर्वी पोस्टर/बोर्डबाबत गोंधळ झाला आहे. हे पोस्टर पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांचे आहे. दुसरीकडे, केरळमधील भाजप (BJP) युनिट आता या पोस्टरबाबत आयोजकांच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह आणि आक्षेप घेत आहे.

'राष्ट्रीय महिला परिषदेची संघटना'

ऑल इंडिया डेमोक्रॅटिक वुमेन्स असोसिएशन (AIDWA) 6 जानेवारी ते 9 जानेवारी दरम्यान केरळमध्ये राष्ट्रीय महिला परिषद आयोजित करणार आहे. राजधानी तिरुअनंतपुरमच्या पलायम परिसरात या कार्यक्रमाशी संबंधित एक पोस्टर लावण्यात आले आहे. ज्यामध्ये पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांचा गौरव करण्यात आला आहे. इतकेच नाही तर या पोस्टरमध्ये पालयम जंक्शन जिथे शहीद स्मारक आहे, त्याला 'बेनझीर भुट्टो स्क्वेअर' असे नाव देण्यात आले आहे.

भाजपने निषेध केला

केरळच्या भाजप युनिटने याला विरोध केला असून हे पोस्टर त्वरित हटवण्याची मागणी केली आहे. केरळमधील सीपीएम सरकार भारतासोबत 1000 वर्षे युद्ध लढण्याची भाषा करणाऱ्या पाकिस्तानी नेत्याच्या सन्मानार्थ पोस्टर लावत असल्याचा आरोप भाजपने केला आहे.

तर दुसरीकडे, केरळ भाजपचे प्रवक्ते संदीप वाचस्पती यांनी या फोटोचे पोस्टर ट्विटरवर शेअर केले आहे. ट्विट करत ते म्हणाले की, 'सीपीएमच्या महिला विंगच्या राष्ट्रीय अधिवेशनासंदर्भात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांचा भारताविरुद्ध 1000 वर्षांचे युद्ध घोषित करतानाचा फोटो आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT