Petrol-Diesel Price  Dainik Gomantak
देश

Petrol Diesel Price: लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारने दिली खूशखबर, पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त

Modi Government: आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारने आनंदाची बातमी दिली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 2 रुपयांनी कपात करण्यात आली आहे.

Manish Jadhav

Petrol Diesel Price: आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारने चांगलीच बातमी दिली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 2 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याची माहिती दिली. उद्या (शुक्रवारी) सकाळी 6 वाजल्यापासून देशभरात कमी झालेल्या किमती लागू होतील. याआधी, गुरुवारीच राजस्थान सरकारनेही पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅटमध्ये दोन टक्के कपात करण्याची घोषणा केली, ज्यामुळे जनतेला मोठा दिलासा मिळाला. निवडणूक आयोग एक ते दोन दिवसांत लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करु शकतो, हे विशेष. एप्रिल आणि मे महिन्यात अनेक टप्प्यांत मतदान होऊ शकते.

केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली आहे. पुरी यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, ''जग कठीण काळातून जात असताना विकसित आणि विकसनशील देशांमध्ये पेट्रोलच्या किमती 50-72 टक्क्यांनी वाढल्या आहे. विशेष म्हणजे, आपल्या शेजारील देशांमध्ये आता पेट्रोल उपलब्ध नाही. 50 वर्षातील सर्वात मोठे तेल संकट असूनही, पंतप्रधान मोदींच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे मोदींच्या परिवारावर परिणाम झाला नाही. भारतातील पेट्रोलचे दर वाढण्याऐवजी गेल्या अडीच वर्षांत 4.65 टक्क्यांनी कमी झाले आहेत.''

'भारत हा एकमेव देश आहे जिथे किमती वाढल्या नाहीत पण कमी झाल्या'

केंद्रीय मंत्री आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहिले की, "भारत हा एकमेव देश होता जिथे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या नाहीत, मात्र कमी झाल्या. आम्ही आमच्या देशवासियांसाठी जमेल तिथून तेल विकत घेतले. मोदीजी पंतप्रधान होण्यापूर्वी आपण 27 देशांकडून कच्च्या तेलाची खरेदी करायचो, परंतु त्यांच्या नेतृत्वाखाली आपण आपल्या देशवासीयांना स्वस्त पेट्रोल, डिझेल आणि गॅस उपलब्ध करुन देण्यासाठी ही व्याप्ती वाढवली आणि आता गरजा भागवण्यासाठी आपण 39 देशांकडून खरेदी करत आहोत.''

ते पुढे म्हणाले की, ''एवढेच नाही तर पंतप्रधान मोदींनी नोव्हेंबर 2021 आणि मे 2022 मध्ये दोन वेळा पेट्रोल आणि डिझेलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क कमी केले आणि भाजप शासित राज्यांनी व्हॅट दर कमी करण्याची खात्री केली. मोदींच्या परिवाराला हा थेट दिलासा आहे. हेच कारण आहे की आजही भाजप शासित राज्ये आणि इतर राज्यांमध्ये पेट्रोलच्या दरात सुमारे 15 रुपये आणि डिझेलच्या दरात सुमारे 11 रुपयांची तफावत आहे.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT