Train Food Quality Viral Video: सोशल मीडियावर अनेकदा रेल्वेतील व्हिडिओ व्हायरल होतात. कधी मग जोडप्याचा डान्स करतानाचा तर कधी भांडणाचा तर कधी रेल्वेतील जेवणाच्या खराब क्वालिटीचा व्हिडिओ व्हायरल होतो. सध्या असाच एक रेल्वेतील व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. खराब जेवणावरुन प्रवाशाने थेट पेंट्री कारकडे धाव घेतली. तिथे पोहोचल्यावर त्याने पेंट्री कर्मचाऱ्याशी खराब जेवणावरुन हुज्जत घालण्यास सुरुवात केली.
दरम्यान, प्रवासी पेंट्री कर्मचाऱ्यास जेवण खराब असून डाळ चांगली नाही हे पटवून देण्याचा प्रयत्न करतो. त्यावर कर्मचारी डाळीची चव चाखून जेवण चांगले असल्याचे सांगतो. त्यानंतर दोघांमध्ये जोरदार खडाजंगी सुरु झाली. या घटनेचा व्हिडिओ समोर येताच आयआरसीटीसीने तात्काळ या प्रकरणाची दखल घेतली. सध्या त्यांच्या या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Midea) चांगलाच व्हायरल होत आहे.
व्हिडिओमध्ये प्रवासी पेंट्री कर्मचाऱ्याला सांगतो की, ही डाळ खराब आहे, ज्यावर कर्मचारी 'नाही' म्हणून डोके हलवतो. तो म्हणतो की, ही मूग डाळ आहे. पण प्रवासी त्याच्याशी सहमत न होता म्हणतो, हो, ही मूग डाळ आहे, पण ती पूर्णपणे खराब आहे. पण पेंट्री कर्मचाऱ्याने त्याचे हे म्हणणे अमान्य ठरवत डाळ चांगली असल्याचेच सांगितले. त्यावर प्रवासी नाराज होतो आणि मोठ्या आवाजात जेवण कसे खराब आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर दोघांमध्ये खराब जेवणावरुन वाद सुरु होतो. यासोबतच व्हिडिओ संपतो. या व्हिडिओवर आता यूजर्स देखील आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.
@JituUpadhy1972 नावाच्या यूजरने X वर पोस्ट करत लिहिले, 23 जून 2025 रोजी आंध्र प्रदेश एक्सप्रेस (2086) मधील माझ्या ट्रेन प्रवासादरम्यान मला खराब जेवण मिळाले. त्याने @IRCTCofficial @RailwaySeva आणि @RailMinIndia ला टॅगही केले.
आयआरसीटीसीने या प्रकरणात 2 उत्तरे दिली. पहिल्या उत्तरात @IRCTCofficial ने लिहिले, तुमची तक्रार रेलमॅडॅडवर नोंदवण्यात आली असून तक्रार क्रमांक तुमच्या मोबाईल नंबरवर एसएमएसद्वारे पाठवण्यात आला आहे. तुम्ही या लिंकद्वारे तुमची तक्रार ट्रॅक करु शकता. दुसऱ्या उत्तरात, आयआरसीटीसीने प्रवाशाला त्याची माहिती मागितली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.