Pakistan Dainik Gomantak
देश

Pakistan News:पाकिस्तान मध्ये हिंदू मुलीच्या सक्तीच्या धर्मांतराला विरोध

१६ वर्षीय अल्पसंख्यक हिंदू मुलीचे अपहरण करून जबरदस्तीने धर्मांतर

दैनिक गोमन्तक

पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांच्या सिंध प्रांतातील नवाबशाह येथील एका घराबाहेर 16 वर्षीय अल्पसंख्यक हिंदू मुलीचे अपहरण करून तीचे जबरदस्तीने धर्मांतर करून तिच्या सोबत लग्न करणार्याच्या विरोधात.माजी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांच्या निवासस्थानाबाहेर लोकांनी आंदोलन केला. 6 जुलै रोजी खलील रहमान जानोच्या कुटुंबीयांनी काझी अहमद नगरच्या उन्रर परिसरातून करीनाचे अपहरण केले होते.

त्याचा पोलीस तपास करत नाही असा अरोप करत आंदोलकांनी पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी केली. तसेच माजी राष्ट्रपतींनी या प्रकरणात हस्तक्षेप करून न्याय मिळवून द्यावा आशी मागणी आंदोलकांनी केली. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,करीनाचे अपहरण झाले नसून ती स्वच्छेने खलीलसोबत मीर मोहम्मद गावात गेली आहे. त्याने तिच्याशी कराचीच्या कोर्टात लग्न केले आहे. पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार ,खलीलचे वडील असगर जानो यांना अटक करण्यात आली आहे.

खलीलचे कथित विवाह प्रमाणपत्र दाखवून एसएसपी म्हणाले की मुलीला सिंध उच्च न्यायालयात हजर केले जाईल.आणि तिथून तिला पाहिजे तिथे जाता येईल ,परंतु हिंदू पंचायतीचे उपाध्यक्ष लजपत राय यांनी एसएसपीचा दावा खोटा ठरवला आणि सांगितले की,"हिंदू समाजातील लोक त्यांना भेटले,परंतु त्यांनी मदत केली नाही.

या वर्षाच्या सुरुवातीला सिंध प्रांतातच हिंदू मुलगी पूजा कुमारी हिच्या घरात घुसलेल्या हल्लेखोरांचा निषेध केला म्हणुन तिची हत्या करण्यात आली होती. मानवाधिकार कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की,पाकिस्तानमध्ये महिला,अल्पसंख्याक,मुले,मुली,आणि मीडियामध्ये काम करणाऱ्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News: GMC मध्ये फिजिओथेरपीच्या जागांमध्ये वाढ

Antarctic Climate Change: अंटार्क्टिका किनारपट्टीतील हवामान बदलाचा होणार अभ्यास, गोव्यातून सात संशोधक घेणार सहभाग

Sadye: बहुमजली तसेच जलतरण प्रकल्पांना पाणीपुरवठा बंद करा! सडये ग्रामस्थांची मागणी; सामूहिक शेतीला देणार प्राधान्य

Poinguinim: गालजीबाग, तळपण नदीप्रदूषणावरुन कारवाईची मागणी! पैंगीण ग्रामसभेत मेगा प्रकल्पांना विरोध

Anmod Ghat: अनमोड घाटात वाहतूक ठप्प! संरक्षक कठड्याला धडकला ट्रक; रात्री उशिरापर्यंत वाहनांच्या रांगा

SCROLL FOR NEXT