heroin boats seized Dainik Gomantak
देश

मोठी कारवाई : अरबी समुद्रात ड्रग्जने भरलेली पाकिस्थानी बोट पकडली

दैनिक गोमन्तक

गुजरात : पाकिस्थान आणि भारत यांच्यासंबधात कोणत्या ना कोणत्या कारणाने तणाव वाढत असतो. कधी जम्मु काश्मिर असेल कधी भारत पाकिस्थान सरहद्दीवर होणारी छुपी तस्करी याबरोबर दोन्हा राष्ट्रात फाळणीपासून असणारे तणावाचे वातावरण यांसारख्या कारणामूळे दोन्ही राष्ट्रात सौदार्ह संबंध वाढण्याऐवजी ते वाढतच गेल्याची स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा 280 कोटी रुपये किंमतीचे हेरॉईन घेऊन जात असणारी पाकिस्थानी बोट पकडण्यात तटरक्षक दलाला यश आलं आहे.(pakistan boat containing drugs seized near coast of gujarat)

ही कारवाई गुजरातच्या किनार्‍यावरील जाखाऊजवळ एटीएस भारताच्या तटरक्षक दल यांनी संयुक्तरित्या कारवाई करत ९ कर्मचार्‍यांसह ‘अल हज’ या पाकिस्तानी बोटीला सुमारे 280 कोटी रुपये किंमतीचे हेरॉईन घेऊन जात असताना अरबी समुद्रातील भारताच्या हद्दीत पकडले आहे. हे हेरॉइन तब्बल 56 किलो असल्याची माहिती समोर आली आहे. ही बोट पुढील तपासासाठी जखाऊ येथे आणली जात असल्याची माहिती भारतीय तटरक्षक दलाकडून देण्यात आली आहे.

जानेवारी महिन्यात ही भारतीय तटरक्षक दलाने केली होती कारवाई

भारतीय तटरक्षक दलाने जानेवारी महिन्यात गुजरात किनारपट्टीजवळ अरबी समुद्रातून 10 पाकिस्तानी नागरिकांना पकडले होते. यातील सर्वजण 'यासिन' या पाकिस्तानी बोटीवर होते, जी भारतीय पाण्यात 6-7 मैल अंतरावरून जात असताना पकडली होती. तटरक्षक दलाचे जहाज जवळ येत असल्याचे पाहून बोटीने घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला होताा.एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, पाकिस्तानी बोट भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत असताना ही कारवाई करण्यात आली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

शाळकरी मुलांच्या बाबतीत आपण किती जागरूक, शिक्षित आणि गंभीर आहोत?

विजयनगर साम्राज्य, गोव्याचा संदर्भ; मदुराई आणि कुमार कंपण्णांचा इतिहास याबद्दल जाणून घ्या

Top Most Polluted Countries: जगातील 'हे' 8 देश सर्वाधिक प्रदूषित; क्रमवारीत भारत तिसऱ्या क्रमांकावर!

Goa Politics: दिल्लीत नेमके 'काय' घडले? 'कुणाला' समज, 'कुणाला' आदेश..

SCROLL FOR NEXT