Padma Awards 2023: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात 2023 च्या पद्म पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यादरम्यान माजी केंद्रीय मंत्री एसएम कृष्णा यांना पद्मविभूषण तर आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांना पद्मभूषण आणि पांडवाणी गायिका उषा यांना पद्मश्री प्रदान करण्यात आला.
ज्येष्ठ गुंतवणूकदार आणि आकासा एअरचे संस्थापक दिवंगत राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांना पद्मश्री (मरणोत्तर) प्रदान करण्यात आला. त्यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांनी राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला.
दरम्यान, माता नी पचेडी या 400 वर्ष जुन्या पारंपरिक कलाकुसरीचा वारसा पुढे नेणारे चुनारा समाजाचे 7 व्या पिढीतील कलामकारी कलाकार भानुभाई चित्रारा यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले.
त्याचबरोबर, स्वदेशी पीपल्स फ्रंट ऑफ त्रिपुराचे दिवंगत अध्यक्ष नरेंद्र चंद्र देबबर्मा यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री (मरणोत्तर) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांचा मुलगा सुब्रत देबबर्मा यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
तसेच, कांथा एम्ब्रॉयडरी आर्टिस्ट प्रितिकाना गोस्वामी यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून पद्मश्री आणि जीवशास्त्रज्ञ मोदादुगु विजय गुप्ता यांनाही पद्मश्री मिळाला.
पंजाबी विद्वान डॉ. रतन सिंग जग्गी यांना पद्मश्री आणि कलाकार दिलशाद हुसैन यांना (दशकांपासून पितळेची भांडी कोरण्यासाठी) पद्मश्री मिळाला.
त्याचबरोबर, राष्ट्रपती पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या तीन श्रेणींमध्ये सन्मान प्रदान करतात. कला, सामाजिक कार्य, सार्वजनिक घडामोडी, विज्ञान आणि अभियांत्रिकी, व्यापार आणि उद्योग, वैद्यक, साहित्य आणि शिक्षण (Education), क्रीडा आणि नागरी सेवा अशा विविध क्षेत्रात हे पुरस्कार दिले जात आहेत.
तसेच, दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रजासत्ताक दिन 2023 निमित्त पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. हा पुरस्कार सोहळा राष्ट्रपती भवनात आयोजित करण्यात आला आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.