Defence Parliamentary Committee Meeting: संरक्षणविषयक संसदीय समितीच्या बैठकीत आज मोठा गदारोळ झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बैठकीत अग्निपथ योजनेवर चर्चेच्या मागणीबाबत सदस्यांची नाराजी दिसून आली. अग्निपथ योजनेवर चर्चा करु दिली नसल्याचा आरोप विरोधी पक्षाच्या खासदारांनी केला आहे.
वास्तविक, बसपा खासदार दानिश अली यांनी बैठकीत अग्निपथ योजनेचा मुद्दा उपस्थित केला. बसपा खासदाराने संसदीय समितीच्या बैठकीत हा मुद्दा अजेंड्यामध्ये समाविष्ट करण्याची मागणी केली होती. बसपा खासदारांच्या या मागणीला काँग्रेस (Congress) खासदारांनीही पाठिंबा दिला. मात्र मागणी मान्य न झाल्याने या खासदारांनी सभेतून सभात्याग केला.
दुसरीकडे, दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी सांगितले की, 'सशस्त्र दलातील भरतीसाठी अग्निपथ योजनेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर 25 ऑगस्ट रोजी सुनावणी होईल, कारण सर्वोच्च न्यायालयाला हस्तांतरित केलेली फाइल अद्याप प्राप्त झालेली नाही.'
तसेच, सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) केरळ, पंजाब आणि हरियाणा, पाटणा आणि उत्तराखंड उच्च न्यायालयांना या योजनेच्या विरोधात दाखल केलेल्या सर्व जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत दिल्ली उच्च न्यायालयात (Delhi High Court) हस्तांतरित करण्यास किंवा स्थगित करण्यास सांगितले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.