ओप्पोने भारतात त्यांच्या प्रीमियम फ्लॅगशिप स्मार्टफोन सिरीज Oppo Find X9 आणि Oppo Find X9 Pro चे लाँचिंग केले आहे. दोन्ही स्मार्टफोन Android 16 आधारित नवीन ColorOS 16 सह येतात, तर ओप्पो व हॅसलब्लॅड यांच्या भागीदारीत विकसित केलेला कॅमेरा सिस्टम हे या लाइनअपचे मुख्य आकर्षण आहे. विशेष म्हणजे, Find X9 Pro मध्ये 200MP टेलिफोटो कॅमेरा आणि 7500mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.
ओप्पो फाइंड एक्स९ च्या 12GB + 256GB व्हेरिएंटची भारतातील किंमत ₹74,999 इतकी असून 16GB + 512GB मॉडेल ₹84,999 मध्ये उपलब्ध असेल. हा फोन स्पेस ब्लॅक आणि टायटॅनियम ग्रे रंगांमध्ये मिळणार आहे.
तर ओप्पो फाइंड एक्स९ प्रोचा 16GB + 512GB व्हेरिएंट ₹1,09,999 किमतीत सिल्क व्हाइट आणि टायटॅनियम चारकोल रंग पर्यायांसह उपलब्ध झाला आहे. ही संपूर्ण सिरीज 21 नोव्हेंबरपासून ओप्पो इंडिया ऑनलाईन स्टोअर, फ्लिपकार्ट आणि अमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध होणार असून, Hasselblad Teleconverter Kit ची किंमत ₹29,999 इतकी असेल.
Find X9 मध्ये 6.59-इंच AMOLED डिस्प्ले देण्यात आला असून 120Hz रिफ्रेश रेट, 3600 nits ब्राइटनेस आणि Corning Gorilla Glass Victus 2 संरक्षण मिळते. या फोनला 3nm MediaTek Dimensity 9500 प्रोसेसरची ताकद असून 16GB LPDDR5X RAM व 512GB UFS 4.1 स्टोरेज पर्यंतचे पर्याय उपलब्ध आहेत. फोनमध्ये VC Cooling System देण्यात आली आहे ज्यामुळे गेमिंग आणि मल्टीटास्किंग दरम्यान तापमान नियंत्रणात राहते.
कॅमेरासाठी 50MP ट्रिपल सेटअप देण्यात आला असून Sony LYT-808 OIS Wide, 50MP Ultrawide आणि Sony LYT-600 OIS Telephoto लेन्सचा समावेश आहे. समोर 32MP Sony IMX615 कॅमेरा देण्यात आला आहे. बॅटरीची क्षमता 7,025mAh असून 80W वायर्ड, 50W AirVOOC वायरलेस आणि 10W रिव्हर्स चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. फोनला Wi-Fi 7, Bluetooth 6.0, NFC आणि IP66 + IP68 + IP69 रेटिंग मिळते.
फाइंड एक्स९ प्रोमध्ये 6.78-इंच AMOLED डिस्प्ले असून 1272×2772 रिझोल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट व 3600 nits ब्राइटनेस सपोर्ट उपलब्ध आहे. कॅमेराच्या बाबतीत हा फोन अधिक सक्षम असून 50MP Sony LYT-828 मुख्य लेन्स, 50MP Ultrawide आणि OIS सपोर्टसह 200MP Telephoto कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच समोर 50MP Samsung 5KJN5 सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.
या मॉडेलमध्ये देखील Dimensity 9500, ColorOS 16, UFS 4.1, तसेच 16GB LPDDR5X RAM उपलब्ध आहे. थर्मल परफॉर्मन्ससाठी 36,344 sq.mm VC Cooling System वापरली आहे. बॅटरी क्षमतेत 7,500mAh चा समावेश असून 80W SuperVOOC वायर्ड व 50W AirVOOC वायरलेस चार्जिंग सपोर्ट आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.