राज्यसभेत ऑनलाइन गेमिंग विधेयक २०२५ मंजूर होताच, रिअल मनी गेमिंग उद्योगातील MPL, Dream11 आणि Zupee नं त्यांचे मनी गेम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर ऑनलाइन गेमिंग विधेयक २०२५ लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर झाले आहे. आता राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर ते कायद्यात रूपांतरित होईल. रिअल मनी गेमिंग कंपन्यांना १ कोटी रुपयांच्या दंडापासून तुरुंगवासाची तरतूद देखील यात आहे.
पीटीआयच्या वृत्तानुसार, भारतातील सर्वात मोठ्या गेमिंग प्लॅटफॉर्म एमपीएलने त्यांचे सर्व रिअल मनी गेम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. लिंक्डइन पोस्टमध्ये, कंपनीने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की आम्ही देशाच्या कायद्याचा आदर करतो आणि त्याचे पूर्णपणे पालन करण्यास वचनबद्ध आहोत.
कंपनीने आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे की तात्काळ प्रभावाने आम्ही एमपीएल प्लॅटफॉर्मवरून आमचे सर्व रिअल मनी गेम काढून टाकत आहोत. आमची पहिली प्राथमिकता वापरकर्ते आहेत. आता वापरकर्त्यांनी केलेल्या नवीन ठेवींची अपेक्षा केली जाणार नाही. तथापि, वापरकर्ते त्यांचे शिल्लक काढू शकतात. आतापासून, एमपीएल प्लॅटफॉर्मवर कोणताही ऑनलाइन मनी गेम उपलब्ध राहणार नाही.
झुपीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की गेमिंग प्लॅटफॉर्म पूर्णपणे कार्यरत राहील आणि खेळाडूंना त्यांचे आवडते गेम खेळता येतील. नवीन ऑनलाइन गेमिंग बिल २०२५ मुळे, कंपनी प्लॅटफॉर्मवरून सर्व पेड गेम काढून टाकत असल्याचं झुपीने स्पष्ट केलं आहे.
तुमचीही यापैकी कोणत्याही गेममध्ये पैसे जमा असतील, तर काळजी करू नका. या कंपन्यांनी युजर्सच्या पैशांच्या सुरक्षिततेची खात्री दिली आहे. कंपनीने स्पष्टपणे सांगितले की खेळाडूंचे पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत आणि ते काढता येतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.