Virat Kohli Dainik Gomantak
देश

King Kohli journey,: 18 ऑगस्ट, 18 नंबर जर्सी! 17 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी सुरु झाला कोहलीचा ‘किंग’ बनण्याचा प्रवास; जाणून घ्या विराटचे रेकॉर्ड्स

Virat Kohli Records: 2008 मध्ये विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि तिथूनच एका सामान्य खेळाडूचा ‘किंग कोहली’ (King Kohli) बनण्याचा प्रवास सुरु झाला.

Manish Jadhav

Virat Kohli First International Match: 18 ऑगस्ट ही तारीख क्रिकेट चाहते आणि विशेषतः विराट कोहलीचे चाहते कधीच विसरणार नाहीत. याच दिवशी, 2008 मध्ये विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि तिथूनच एका सामान्य खेळाडूचा ‘किंग कोहली’ (King Kohli) बनण्याचा प्रवास सुरु झाला. आजही त्याच्या चाहत्यांसाठी 18 हा आकडा केवळ जर्सी नंबर नसून एक भावना आहे.

कसा होता विराटचा पहिला आंतरराष्ट्रीय सामना?

दरम्यान, 18 ऑगस्ट 2008 रोजी विराटने श्रीलंकेविरुद्ध दांबुला येथे आपला पहिला एकदिवसीय सामना खेळला. त्यावेळी तो अवघ्या 19 वर्षांचा होता. या सामन्यात त्याने गौतम गंभीरसोबत सलामीला फलंदाजी केली. आपल्या पहिल्याच सामन्यात तो काही विशेष कामगिरी करु शकला नाही. श्रीलंकेच्या कुलशेखराने त्याला 12 धावांवर पायचीत (LBW) बाद केले.

त्याने 22 चेंडूंचा सामना करत फक्त एक चौकार मारला होता. या सामन्यात भारतीय संघ 146 धावांवर सर्वबाद झाला होता. श्रीलंकेने हे लक्ष्य केवळ दोन गडी गमावून 34.5 षटकांत सहज पूर्ण केले होते. त्यावेळी कोणी विचारही केला नसेल की, 12 धावांवर बाद होणारा हा युवा खेळाडू भविष्यात वनडे क्रिकेटमधील सर्वात महान फलंदाजांपैकी एक म्हणून ओळखला जाईल.

वनडे क्रिकेटमधील कोहलीची अविश्वसनीय कामगिरी

वनडे क्रिकेट हा असा फॉरमॅट आहे, जिथे विराट कोहलीने आपल्या कारकिर्दीत सर्वाधिक धावा केल्या आहेत. टी-20 आंतरराष्ट्रीय आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही तो या फॉरमॅटमध्ये अजूनही सक्रिय आहे. आतापर्यंत त्याने 302 एकदिवसीय सामने खेळले आहेत. यातील 290 डावांत त्याने 57.88 च्या प्रभावी सरासरीने तब्बल 14,181 धावा केल्या आहेत. त्याचे हे आकडेच त्याची सातत्यपूर्ण कामगिरी सिद्ध करतात.

वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत कोहली तिसऱ्या स्थानावर आहे. त्याच्या नावावर 74 अर्धशतके आणि 51 शतके आहेत, जी कोणत्याही फलंदाजासाठी एक मोठी उपलब्धी आहे. 51 शतकांसह तो वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारा फलंदाज बनला. या विक्रमात त्याने महान फलंदाज सचिन तेंडुलकरला मागे सोडले, ज्याच्या नावावर 49 शतके आहेत.

विक्रमांची बादशाहत आणि कारकिर्दीतील मोठी कामगिरी

विराट कोहलीने (Virat Kohli) वनडे क्रिकेटमध्ये अनेक मोठे विश्वविक्रम रचले आहेत. 8000, 9000, 10,000, 11,000, 12,000, 13,000 आणि 14,000 धावा सर्वात जलद पूर्ण करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. 2012 मध्ये पाकिस्तानविरुद्ध केलेल्या 183 धावांची त्याची खेळी त्याच्या वनडे कारकिर्दीतील सर्वात मोठी खेळी आहे.

सामन्यातील कामगिरीसोबतच विराट संघाच्या यशातही नेहमीच महत्त्वाचा वाटेकरी राहिला आहे. तो 2011 च्या एकदिवसीय विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा भाग होता, ज्यामुळे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न पूर्ण झाले. याशिवाय, तो 2013 आणि 2025 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या संघाचाही सदस्य होता. 2023 च्या विश्वचषकात (World Cup) त्याने आपला जलवा दाखवून दिला होता. त्या स्पर्धेत त्याने एकूण 765 धावा करुन ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’चा किताब पटकावला होता. वनडे क्रिकेटमधील त्याची ही कामगिरी त्याला ‘किंग कोहली’ या नावाला सार्थ ठरवते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asia Cup 2025: IND vs PAK मॅच होणार नाही! आशिया कपमधून पाकिस्तान 'आऊट', आता 'या' देशाच्या संघाला मिळणार संधी

Viral Video: लहान मुलांना वाचविण्यासाठी जर्मन शेफर्डने बाल्कनीतून घेतली उडी; पाहा व्हिडिओ

Budget Friendly India Tour: दिल्ली, गोवा, जयपूर...14 दिवसांत भारत दर्शन; कसा कराल बजेटफ्रेन्डली प्रवास? वाचा प्लॅन

Viral Video: "असले मित्र नको रे बाबा!" धोकादायक मस्करीचा व्हिडिओ व्हायरल; त्याची 'ही' अवस्था पाहून नेटकरी संतप्त

Operation Sindoor: पाकिस्तानच्या ‘पळपुट्या' नौदलाची पोलखोल! ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान नौका ग्वादर बंदरात लपवल्या; सॅटेलाईट फोटोंमधून खुलासा

SCROLL FOR NEXT