Narendra Modi  Dainik Gomantak
देश

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त पंतप्रधान मोदी म्हणाले...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (मंगळवारी ) नमो अ‍ॅपद्वारे देशभरातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

दैनिक गोमन्तक

उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांचा प्रचार सुरू आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (मंगळवारी ) नमो अ‍ॅपद्वारे देशभरातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, सध्या देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. आम्ही 23 जानेवारीपासून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यास सुरुवात केली आहे. (Narendra Modi Latest News)

मोदी पुढे म्हणाले, आज राष्ट्रीय मतदार दिन आहे. मी देशातील सर्व मतदारांचे (Voters) अभिनंदन करतो. या दिनानिमित्त मी सर्व नागरिकांना आगामी निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहन करतो. प्रत्येक मत महत्वाचे आहे. देशातील जनतेने निवडणुकांच्या माध्यमातून सातत्याने सरकार स्थापन केली आहेत, ही देशातील प्रत्येक मतदारासाठी अभिमानाची बाब आहे.

या वेळेस मोदी यांनी निवडणूक आयोगवर (Election Commission) भाष्य केले. ते म्हणाले, भारत (India) अशा देशांपैकी एक आहे जिथे निवडणूक आयोग (EC) लोकांना नोटीस बजावू शकतो, अधिकाऱ्यांची बदली करू शकतो. आपल्या निवडणूक प्रक्रियेने विविध देशांसाठी एक मानदंड निश्चित केला आहे. तुम्ही सर्व नागरिकांना मतदानासाठी प्रोत्साहित करा, असे पंतप्रधान मोदींनी सर्व कार्यकर्त्यांना सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT