Viral Video Dainik Gomantak
देश

Viral Video: आजीबाईंचा भोजपुरी गाण्यावर जबरदस्त डान्स, सोशल मीडियावर व्हिडिओचा धूमाकूळ; नेटकरी म्हणाले, 'जुने खेळाडू मैदानात उतरले...'

Elderly Women Dance Video: आजच्या डिजिटल युगात आणि सोशल मीडियाच्या जमान्यात दररोज हजारो व्हिडिओ व्हायरल होतात.

Manish Jadhav

Elderly Women Dance Video: आजच्या डिजिटल युगात आणि सोशल मीडियाच्या जमान्यात दररोज हजारो व्हिडिओ व्हायरल होतात. या व्हिडिओजमध्ये अनेकदा काहीतरी नवीन, वेगळं किंवा मनोरंजक पाहिल्यावर लोक त्यावर भरभरुन प्रेम करतात आणि ते व्हायरल करतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) धुमाकूळ घालत आहे, ज्यामध्ये दोन वृद्ध महिलांचा उत्साहाने भरलेला डान्स पाहून नेटकरीही थक्क झाले आहेत. वयाच्या सत्तरीतही त्या दोघींचा जोश पाहून अनेक तरुणांनाही लाज वाटेल, असा हा व्हिडिओ आहे.

आधी हा व्हिडिओ पाहा!

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @mp____official नावाच्या अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये एका कौटुंबिक किंवा लग्नसोहळ्यासारख्या कार्यक्रमात काही महिलांचा (Womens) समूह दिसत आहे. याच समूहात उभ्या असलेल्या दोन वृद्ध महिला अचानक भोजपुरी गाण्यावर जोरदार डान्स करायला सुरुवात करतात. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, उत्साह आणि प्रत्येक स्टेपमधील ऊर्जा पाहून लोकांना आश्चर्याचा धक्का बसतो.

जुने खेळाडू पुन्हा मैदानात

या व्हिडिओमध्ये दिसते की, पहिल्या एका वृद्ध महिलेने हातवारे करत आणि उत्साहाने नाचायला सुरुवात केली. त्यानंतर तिच्या शेजारी उभ्या असलेल्या दुसऱ्या वृद्ध महिलेलाही तिचा जोश बघून राहावले नाही आणि तीदेखील त्याच उत्साहात नाचायला लागली. या दोघींचे एकत्र येऊन नाचणे आणि त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून तिथे उपस्थित असलेले लोकही त्यांच्यावर फिदा झाले. त्यांच्या डान्सने संपूर्ण कार्यक्रमात एक उत्साही आणि आनंदी वातावरण निर्माण झाले. या व्हिडिओवर 'पुराने खिलाडी मैदान में वापस आ चुके हैं' (जुने खेळाडू पुन्हा मैदानात आले आहेत.) असे लिहिले, जे त्यांच्या जोशाला योग्य प्रकारे व्यक्त करतात.

हा व्हिडिओ आतापर्यंत 15 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केला असून हजारो नेटकऱ्यांनी यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. यातील अनेक प्रतिक्रिया व्हिडिओच्या मूळ हेतूशी जुळणाऱ्या आहेत, ज्यामुळे तो लोकांच्या पसंतीस उतरला आहे.

सोशल मीडियावर लोकांच्या प्रतिक्रिया

व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक यूजर्संनी वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत, ज्यातून या व्हिडिओने त्यांच्या मनावर किती सकारात्मक परिणाम केला, हे दिसून येते:

  • एका युजरने लिहिले, "जब पेंशन हैं तो टेंशन किस बात का मौज ही मौज।" (जेव्हा पेन्शन आहे, तेव्हा काळजी कशाची? फक्त मजाच मजा). या कमेंटमध्ये वृद्धत्वातील आर्थिक सुरक्षिततेमुळे मिळणाऱ्या स्वातंत्र्याचा आणि आनंदाचा उल्लेख आहे.

  • दुसऱ्या एका युजरने म्हटले, "दादीजी तो 40 की लग रही हैं।" (आजी तर 40 वर्षांच्या वाटत आहेत). ही प्रतिक्रिया त्या महिलांच्या ऊर्जेला आणि त्यांच्या उत्साही स्वभावाला दिलेली एक मोठी दाद आहे.

  • तिसऱ्या युजरने लिहिले, "वाह! दादी मौज कर दी।" (वाह! आजी, मजा आणली.)

  • चौथ्या युजरने तर थेट, "गजब कर दिया भाई इन लोगों ने तो।" (अरे देवा! या लोकांनी तर कमालच केली) अशी प्रतिक्रिया दिली आहे.

या सर्व प्रतिक्रिया पाहून हे स्पष्ट होते की, या व्हिडिओने केवळ मनोरंजनच केले नाही, तर वयाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोनही बदलला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT