Odisha Chief Minister Naveen Patnaik
Odisha Chief Minister Naveen Patnaik Dainik Gomantak
देश

Jagannath Temple Heritage Corridor: 800 कोटींच्या जगन्नाथ मंदिर हेरिटेज कॉरिडॉरचे CM पटनायक यांच्या हस्ते उद्घाटन

Manish Jadhav

Jagannath Temple Heritage Corridor: ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी आज (17 जानेवारी रोजी) पुरी येथील ऐतिहासिक श्री जगन्नाथ मंदिराभोवती 800 कोटी रुपयांच्या हेरिटेज कॉरिडॉर प्रकल्पाचे उद्घाटन केले. श्रीमंदिर परिक्रमा प्रकल्पाचे अधिकृतरित्या उद्घाटन मुख्यमंत्री पटनायक यांनी पुरीचे गजपती महाराज दिव्यसिंह देब आणि सुमारे 90 मंदिरांचे प्रतिनिधी आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत केले. भगवान जगन्नाथ यांच्या आशीर्वादामुळे हा प्रकल्प शक्य झाला आहे, असे मुख्यमंत्री पटनायक यावेळी म्हणाले.

मंदिरात या नवीन सुविधा भाविकांना मिळणार आहेत

यावेळी मुख्यमंत्री नवीन पटनायक म्हणाले की, ''भगवान जगन्नाथ यांच्या आशीर्वादाने हा प्रकल्प शक्य झाला आहे. या प्रकल्पांतर्गत मंदिराभोवती वाहनतळ, भाविकांना ये-जा करण्यासाठी रस्ते आणि पूल, भाविकांसाठी सुविधा केंद्र, क्लोकरुम, स्वच्छतागृहे आणि इतर अनेक सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत.'' उदघाटन कार्यक्रमानिमित्त तीर्थक्षेत्र पुरी शहर फुलांनी, रंगीबेरंगी दिवे आणि भित्तीचित्रांनी सजवण्यात आले आहे.

4 वर्षांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी संकल्प केला होता

दरम्यान, 3 मे 2019 रोजी चक्रीवादळामुळे पुरी शहरात हाहाकार उडाला होता. वादळामुळे शहराचे मोठे नुकसान झाले होते. यामध्ये मोठ्याप्रमाणात घरांची पडझड झाली होती. याचवेळी, मुख्यमंत्री पटनायक यांनी 12 व्या शतकातील या जगप्रसिद्ध मंदिराचे संपूर्ण नूतनीकरण करण्याचा संकल्प केला होता.

ओडिशा सरकार इतर अनेक मंदिरांमध्येही सुविधा वाढवणार आहे

ओडिशा सरकारने 2019 मध्ये पुरी जगन्नाथ मंदिराच्या हेरिटेज कॉरिडॉर प्रकल्पाची घोषणा केली होती. ज्या अंतर्गत सरकारने मंदिराभोवती 75 मीटरचा कॉरिडॉर बनवला आहे. ग्रीन बफर झोन, वॉकिंग पाथ, रिसेप्शन सेंटर, कल्चरल सेंटर, लायब्ररी, जगन्नाथ बल्लभ तीर्थक्षेत्र विकसित करण्यात आले आहे. याशिवाय भुवनेश्वरचे लिंगराज मंदिर, संबलपूरचे समलेश्वरी मंदिर आणि बेरहामपूरच्या तारा तारिणी मंदिरातही सुविधा वाढवण्यात येणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Todays Update: लाटंबार्से पंचायतीत सत्ताबदल अटळ; आमदार चंद्रकात शेट्ये यांना मोठा धक्का

Margao: दिगंबर कामतांची चिंता वाढली; मडगावमध्ये सरदेसाईंचा 'जनता दरबार', शेकडो लोकांना मांडल्या समस्या

Goa Assembly Session: ST आरक्षणासाठी युरी आलेमाव अधिवेशनात आवाज उठवणार; 'अस्मिताय दिसा'सह 4 खाजगी ठराव

Goa News: कोलवा PSI ने मारहाण केल्याचा आरोप करणाऱ्या महिलेवर खंडणीचा गुन्हा, पतीसह झाली होती अटक

Futsal Goa: गोव्याच्या आंबेली स्पोर्टस क्लबचा गतविजेत्यांना मिनर्व्हा अकादमीला धक्का, उपांत्य फेरीत प्रवेश

SCROLL FOR NEXT