Nupur Sharma Dainik Gomantak
देश

नुपूर शर्मांची जीभ कापणाऱ्याला 1 कोटींचे बक्षीस, भीम आर्मीने केली घोषणा

प्रेषित मोहम्मद यांच्यावर भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा मुद्दा सातत्याने गाजत आहे.

दैनिक गोमन्तक

प्रेषित मोहम्मद यांच्यावर भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा मुद्दा सातत्याने गाजत आहे. आता या वादात भीम आर्मीनेही उडी घेतली आहे. भीम आर्मीचे प्रमुख नवाब सतपाल तंवर यांनी बुधवारी नुपूर शर्मांची जीभ कापणाऱ्याला एक कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले. कानपूर हिंसाचाराची सूत्रधार नुपूर शर्मा असल्याचा आरोप भीम आर्मीने केला आहे. (nupur sharma comment on prophet bhim sena announced 1crore rupees prize)

दरम्यान, भीम सेनेचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष नवाब सतपाल तन्वर यांनी आरोप केला आहे की, 'नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांनी पैगंबरांचा अपमान केला आहे, ज्यामुळे करोडो मुस्लिम बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत.' मोदी सरकार (Modi Government) जाणूनबुजून नुपूर शर्माला अटक करत नसल्याचा आरोप त्यांनी केला. नुपूर शर्मा या कानपूर हिंसाचाराच्या मुख्य सूत्रधार आहेत. मग योगी सरकारने त्यांना आरोपी का बनवले नाही, असा सवालही तंवर यांनी योगी सरकारला विचारला आहे.

सतपाल तंवर म्हणाले की, 'नुपूर शर्मासारख्या नेत्याला समाजात राहण्याचा अधिकार नाही. त्यांना तात्काळ तुरुंगात पाठवावे किंवा देशाबाहेर हाकलून द्यावे.' नुपूर शर्मांनी केलेल्या या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे जगभर भारताची (India) बदनामी होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

शिवाय, नुकतेच एका टीव्ही चर्चेदरम्यान नुपूर शर्माने पैगंबर मोहम्मद यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. चौफेर दबावानंतर भाजपने त्यांना पक्षातून निलंबित केले आहे. अनेक कट्टरवादी लोक नुपूर शर्मांना धमक्याही देत आहेत. वाढलेला धोका पाहता दिल्ली पोलिसांनी नुपूर यांना सुरक्षा पुरवली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: तरुणीची अजब ड्रायव्हिंग स्टाईल व्हायरल, व्हिडिओ पाहून नेटीझन्स लोटपोट; म्हणाले, ''ब्रेकअप करुन आली...''

शनिदेवाची वक्रदृष्टी संपली, आता सुरु होणार सुखाचे दिवस! 'या' दोन राशींचे भाग्य अचानक चमकणार; डिसेंबरपर्यंतचा काळ ठरणार खास

Cricketer Passes Away: क्रिडाविश्वात शोककळा! माजी क्रिकेटपटूचे वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी निधन; दिल्लीत सुरू होते उपचार

Stray Dogs Virus: भटक्या कुत्र्यांना 'व्हायरस'ची लागण? कुत्र्यांच्या मृत्यूच्या घटनांत वाढ, डिचोलीत चिंता

Syria Bomb Blast: सीरियात हॉटेलबाहेर भीषण स्फोट! फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष थोडक्यात बचावले, 6 जणांचा मृत्यू VIDEO

SCROLL FOR NEXT