Nuh Violence Accused Bittu Bajrangi Arrested  Dainik Gomantak
देश

Nuh Violence: नूह हिंसाचारातील आरोपी बिट्टू बजरंगीला फरिदाबाद येथून अटक!

Bittu Bajrangi Arrested: हरियाणातील नूह हिंसाचाराचा आरोपी बिट्टू बजरंगी याला मेवात सीआयए पोलिसांनी मंगळवारी अटक केली.

Manish Jadhav

Nuh Violence Accused Bittu Bajrangi Arrested: हरियाणातील नूह हिंसाचाराचा आरोपी बिट्टू बजरंगी याला मेवात सीआयए पोलिसांनी मंगळवारी अटक केली. 31 जुलै रोजी झालेल्या नूह हिंसाचारात बिट्टू बजरंगीचे नाव पुढे आले होते.

पोलिसांनी त्याला फरिदाबाद येथून अटक केली आहे. बिट्टू बजरंगी स्वतःची ओळख गौरक्ष अशी सांगतो. नूह हिंसाचारानंतर 1 ऑगस्ट रोजी हरियाणातील फरिदाबाद येथील डबुआ पोलिस ठाण्यात बिट्टू बजरंगीच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता.

बिट्टूवर भडकाऊ भाषण दिल्याचा आरोप आहे. त्याचवेळी, सुमारे दोन आठवड्यांपूर्वी बिट्टू बजरंगीने एका मीडिया चॅनलला दिलेल्या मुलाखतीत दावा केला होता की, शोभा यात्रेतील काही लोकांनी षड्यंत्र रचून नूह येथे हिंसाचार घडवून आणला.

दरम्यान, नूह-गुरुग्राम हिंसाचार प्रकरणात मोनू मानेसरनंतर सर्वाधिक चर्चेत आलेलं नाव म्हणजे बिट्टू बजरंगीचं. 31 जुलै रोजी विश्व हिंदू परिषदेच्या मिरवणुकीपूर्वी त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये तो प्रक्षोभक वक्तव्य करताना आढळला होता.

नूह हिंसाचाराचा आरोपी बिट्टू बजरंगीला पोलिसांनी फरीदाबादमधील येथील त्याच्या घरातून अटक केल्याचे सांगितले जात आहे.

बिट्टू बजरंगीविरुद्ध नूह येथील सदर पोलिस (Police) ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिट्टू बजरंगीवर 148,149,332, 353,186,395, 397,506,25,54,59 कलमे लावण्यात आली आहेत.

कोण आहे बिट्टू बजरंगी

बिट्टू बजरंगी हा बजरंग दलाच्या फरिदाबाद युनिटचा प्रमुख आहे. तो फरिदाबादचा रहिवासी असून त्याचे खरे नाव राजकुमार असे आहे. बिट्टू बजरंगी स्वतःला गोरक्षक म्हणवून घेतो. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये बिट्टू बजरंगी त्याच्या समर्थकांसोबत दिसला होता.

यानंतरच तणाव वाढला होता. नूहपासून सुरु झालेला हिंसाचार हरियाणातील फरिदाबाद, पलवल, होडल, गुरुग्राम आणि सोहना जिल्ह्यांमध्येही पसरला होता. या हिंसाचारात अनेक जण जखमी झाले असून, हरियाणा (Haryana) सरकारही चौकशीच्या फेऱ्यात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT