NIA Team Attack In West Bengal
NIA Team Attack In West Bengal Dainik Gomantak
देश

NIA Team Attack In West Bengal: बंगालमध्ये ईडीनंतर आता एनआयएच्या टीमवर हल्ला; हल्लेखोरांकडून आरोपीला नेण्यापासून रोखण्याचा प्रयत्न

Manish Jadhav

NIA Team Attack In West Bengal: काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालमध्ये अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकावर हल्ला झाला होता. आता तपासासाठी गेलेल्या नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या (एनआयए) अधिकाऱ्यांच्या पथकावर हल्ला झाल्याच्या बातम्याही समोर येत आहेत. स्फोटाच्या तपासासाठी एनआयएचे पथक पूर्व मेदिनीपूरमधील भूपतीनगर येथे पोहोचले असताना हा ताजा हल्ला झाला. पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, आंदोलकांनी एनआयए टीमला आरोपीला सोबत नेण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, भूपतीनगर बॉम्बस्फोटाच्या तपासाची माहिती घेण्यासाठी NIA टीमने गावातील एका व्यक्तीला अटक केली. त्या व्यक्तीला चौकशीसाठी नेले जात होते. त्याचवेळी, अनेकांनी एनआयएच्या तपास अधिकाऱ्यांना घेराव घातला आणि त्या व्यक्तीच्या सुटकेची मागणी केली. एनआयए पथकावर विटा आणि दगडफेक करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे एनआयएचे दोन अधिकारी जखमी झाले. हल्लेखोरांनी केलेल्या दगडफेकीमुळे एनआयएच्या अनेक वाहनांचे नुकसान झाले. गाडीच्या काचा फोडल्या. आज एनआयएच्या पथकासोबत केंद्रीय पोलीस दलाचे जवानही होते. आता परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात येत आहे. हल्ल्यानंतर एनआयएचे अधिकारी स्थानिक पोलीस ठाण्यात गेले.

दुसरीकडे, डिसेंबर 2022 मध्ये भूपतीनगर स्फोटाने हादरले होते. तृणमूल काँग्रेसचे बूथ अध्यक्ष राजकुमार मन्ना, त्यांचा भाऊ देवकुमार मन्ना आणि विश्वजित गायन यांच्यावर बेकायदेशीर सट्टेबाजीचा आरोप होता. एनआयए या घटनेचा तपास करत आहे. भूपतीनगर तपासासंदर्भात एनआयएने आठवडाभरापूर्वी तृणमूल काँग्रेसच्या आठ नेत्यांना समन्स बजावले होते. नवकुमार पांडा, मिलन बार, सुबीर मैती, अरुण मैती उर्फ ​​उत्तम मैती, शिवप्रसाद गायन, बालईचरण मैती, अनुब्रता जाना आणि मानवकुमार बरुआ यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती आहे. यापूर्वी, या आठ जणांना नोटिसाही पाठवण्यात आल्या होत्या, मात्र त्यांनी त्या नोटीसला उत्तर दिले नाही. आठवडाभरापूर्वी दुसऱ्यांदा नोटीस पाठवण्यात आली होती. टीएमसीच्या नेत्यांनीही त्याकडे दुर्लक्ष केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Todays Live Update: कोर्टाचा सख्त आदेश; घरमालकांनीच मोडली बेकायदेशीर घरे

Goa Beach: गोव्यातील समुद्र किनाऱ्यावरील हालचालीवर येणार निर्बंध; बीचच्या धारण क्षमतेचा NIO करणार अभ्यास

Shirgao Panchayat: शिरगाव पंचायतीत सत्ताबदल अटळ; सरपंच, उपसरपंचांविरुद्धचा अविश्वास ठराव संमत

Margao: कामतांचे हेतुपुरस्‍सर दुर्लक्ष, मुद्दाम कामे अडवतात; मडगावात कुरतरकर बहीण- भावाचा भाजपला रामराम

Pakistan Car Blast: पाकिस्तानमध्ये अफगाणिस्तान सीमेजवळ मोठा कार स्फोट; माजी खासदारासह 4 जण जागीच ठार

SCROLL FOR NEXT