Medical Students Dainik Gomantak
देश

Ukraineमधून परतलेले MBBS विद्यार्थी भारतात होणार डॉक्टर, NMCने दिली मान्यता

रशिया आणि युक्रेनमधील युद्धादरम्यान मायदेशी परतलेल्या 20,000 वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या भविष्याबाबत केंद्र सरकारने आज एक मोठी घोषणा केली आहे.

दैनिक गोमन्तक

Ukraine Returned Medical Students: रशिया आणि युक्रेनमधील युद्धादरम्यान मायदेशी परतलेल्या 20,000 वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या भविष्याबाबत केंद्र सरकारने आज एक मोठी घोषणा केली आहे. सरकारने युक्रेनमधून परतलेल्या वैद्यकीय विद्यार्थ्यांना परदेशी वैद्यकीय पदवी परीक्षेला बसण्याची परवानगी दिली आहे.

परराष्ट्र मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, युक्रेनमधून सुमारे 20,000 भारतीय विद्यार्थी परतले आहेत. काही दिवसांपूर्वी नॅशनल मेडिकल कमिशनने नियमांचा हवाला देत आपले करिअर पणाला लावून परत आलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यास नकार दिला होता.

रशियासोबत सुरू असलेल्या युद्धामुळे युक्रेनमधून भारतात परतलेल्या अनेक एमबीबीएस विद्यार्थ्यांचे करिअर उद्ध्वस्त होण्यापासून वाचणार आहे. रशिया युक्रेन युद्धामुळे हे वैद्यकीय विद्यार्थी शिक्षण पूर्ण करू शकले नाहीत, आता हे वैद्यकीय विद्यार्थी भारतात डॉक्टर होऊ शकणार आहेत.

हीच गोष्ट त्या विद्यार्थ्यांना लागू होईल जे कोविड 19 मुळे चीन किंवा इतर देशांमधून वैद्यकीय शिक्षण पूर्ण करू शकले नाहीत आणि त्यांना परतावे लागले. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या निर्णयामुळे हे शक्य झाले आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोग अर्थात NMC ने या विद्यार्थ्यांना FMGE परीक्षेला बसण्याची परवानगी दिली आहे. पण एका अटीसह.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT