Nitish Kumar Dainik Gomantak
देश

'Nitish Kumar' on death due to Alcohol: 'जो पिणार तो मरणार' दारुने होणाऱ्या मृत्युवर 'नितीश कुमार' यांची प्रतिक्रिया

विषारी दारुमुळे होणाऱ्या मृत्यूवर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी जो पिणार तो मरणार अशी प्रतिक्रिया दिली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

मोठ्या संख्येने विषारी दारुमुळे होणाऱ्या मृत्यूवर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ''जो पिणार तो मरणार'' अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी राष्ट्रीय जनता दलाचे आमदार सुधाकर सिंह यांनी सरकार संरक्षित नरसंहार असं म्हटलेलं आहे.

बिहार विधानसभेच्या सध्या सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात बुधवारी (14 डिसेंबर) दारुमुळे होणाऱ्या मृत्यूवर जोरदार चर्चा झाली. पण आज गुरूवारी ही चर्चा आधिक जोरदार झाली.

गुरूवारी झालेल्या या चर्चेत एका बाजुला मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) 'जो पिणार तो मरणार' असं म्हणत असताना दुसरीकडे राजदचे आमदार सुधाकर सिंह याला सत्ता संरक्षित नरसंहार म्हणत आहेत. या चर्चेत राजद च्या भाई विरेंद्र यांंनी या प्रकरणात 'भाजपा'ला जबाबदार धरले तर जगदानंद सिंह यांचे पुत्र आणि आपल्या बंडखोर स्वभावामुळे मंत्रीपद गमावलेले सुधाकर सिंह यांनी सरकारवर टीका केली आहे.

यावेळी नितीश कुमार यांनीही विरोधकांवर जोरदार टिका केली. नितीश कुमार म्हणाले कि, बिहारने महात्मा गांधीच्या विचाराने आणि बिहारच्या महिलांच्या मताचा आदर करुन दारुबंदी केली होती. आपण सर्वांनी दारुविरोधात अभियान चालवायला हवे.

विरोधकांवर टिका करताना नितीश कुमार म्हणाले कि, विरोधकांनी आधी त्यांची सत्ता असलेल्या राज्यात दारुच्या संदर्भात काय अवस्था आहे हे पहावं. विरोधकांची सत्ता असलेल्या राज्यात दारुमुळे किती लोक दगावले ? याचा विचार करावा.

सारण इथं विषारी दारुमुळे झालेल्या मृत्यूला भाजप जबाबदार आहे, असा आरोप राजदच्या विरेंद्र सिंह यांनी केले असले तरी सत्ताधारी पक्षाचे आमदार असुनही सुधाकर सिंह यांनी मात्र सरकारला घरचा आहेर दिला आहे. यावर भाजपच्या आमदारांनी टाळ्या वाजवुन सुधाकर सिंह यांच्या भुमीकेचे स्वागत केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Morjai Temple Case: मोरजाई देवस्थानच्या मालमत्तेत अपहाराचा आरोप! माजी अध्यक्षासह दोघांना अटक; मांद्रे पोलिसांकडून गुन्हा दाखल

Indonesia Passenger Ship: इंडोनेशियात 240 प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज बेपत्ता; वादळी हवामानामुळे संपर्क तुटल्याची भीती, बचावकार्य युद्धपातळीवर सुरु

Goa Politics: भाजपला तिसऱ्या आघाडीची भीती नाही! दामू नाईकांचा विरोधकांना टोला; '2027 मध्ये पुन्हा भाजपच सत्तेत येणार'

Goa Congress: काँग्रेसची 'गोवा राखण यात्रा' 22 सप्टेंबरपासून! 27 दिवसांत सर्व 40 मतदारसंघांचा दौरा; जमीन, पर्यावरण आणि अस्मितेसाठी लढ्याची घोषणा

Guru Mangal Yuti 2026: 18 सप्टेंबरला महाचमत्कार! गुरु-सेनापती युतीनं चमकणार 4 राशींचं नशीब; हाती लागणार कुबेराचा खजिना

SCROLL FOR NEXT