Nitin Gadkari gave advice on the issue of lack of vaccines 
देश

...तर लसींच्या कमरतेचा प्रश्न '20 दिवसात' मार्गी लागेल: नितीन गडकरी

दैनिक गोमंतक

कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेशी (COVID19 Second Wave) सामना करत असताना देशातील अनेक राज्यांत लसीची (Vaccine) कमतरता भासत असल्याचे पाहायला मिळते आहे. त्यातच केंद्रीय मंत्री (Central Minister) नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी एक दावा केला आहे, त्यानुसार पुढच्या 15 ते 20 दिवसांत लसीच्या कमतरतेची समस्या सोडवली जाऊ शकते. देशातील इतर  बनवण्याची परवानगी (License) देण्यात आल्यास लसीचे उत्पादन वाढवण्यास मदत होईल असे मत नितीन गडकरी यांनी यावेळी व्यक्त केले आहे. यापूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील केंद्र सरकारला असाच सल्ला दिला होता.(Nitin Gadkari gave advice on the issue of lack of vaccines)  

'जेव्हा मागणी वाढते तेव्हा पुरवठा करण्यास अडचणी निर्माण होतात. लस बनवणाऱ्या कंपन्यांनी एका ऐवजी 10 कंपन्यांना परवाने द्यावे आणि त्यांच्याकडून रॉयलटी देखील घ्यावी. प्रत्येक राज्यात 2-3 लॅबोरेटरीज आहेत. त्यांच्याकडे पायाभूत सुविधा देखील आहेत. लस निर्माता कम्पन्यानाची त्यांना फॉर्म्युला देऊन उत्पादन वाढवल्यास 15 ते 20 दिवसात लसीच्या कमतरतेचा प्रश्न मार्गी लागेल' असे मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे.

दरम्यान, वॅक्सीन कंपन्यांनी आधी देशाची गरज पूर्ण करावी आणि नंतर बाहेर लसी पाठवण्याचा विचार करावा असा सल्ला देखील गडकरी यांनी दिला आहे. यापूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील अशाच प्रकारची संकल्पना मांडली असल्याचे पाहायला मिळाले होते. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT