Ladakh Indian Army Vehicle Accident Twitter
देश

Ladakh: भारतीय लष्कराचे वाहन दरीत कोसळले; 9 जवान शहीद, 1 जखमी

कायरी गावाच्या सात किमीपूर्वी लष्कराच्या वाहनाचा दरीत कोसळून अपघात झाला.

Pramod Yadav

Ladakh Indian Army Vehicle Accident: केंद्रशासित प्रदेश लडाखमध्ये शनिवारी संध्याकाळी भारतीय लष्कराच्या वाहनाला अपघात झाला. राजधानी लेहजवळील कायरी गावात लष्कराचे एक वाहन दरीत कोसळले आहे. यात लष्कराच्या नऊ जवानांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

मृत सैनिकांमध्ये आठ सैनिक आणि एक जेसीओ (ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर) यांचा समावेश आहे. तर, एक जवान जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

कायरी गावाच्या सात किमीपूर्वी लष्कराच्या वाहनाचा दरीत कोसळून अपघात झाला. या अपघातात आठ जवान आणि एका जेसीओचा मृत्यू झाला आहे. या अपघातात एक जवानही जखमी झाला असून त्याला उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

लष्कराची हे वाहन कारूहून कायरीच्या दिशेने जात असताना अपघात झाला. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

भारतीय लष्कराच्या या तुकडीमध्ये तीन वाहनांचा समावेश असल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात येत आहे. यातील लष्कराच्या ट्रकला अपघात झाला आहे.

या पथकात तीन अधिकारी, दोन जेसीओ आणि 34 जवानांचा समावेश होता. तीन वाहनांच्या या पथकात एक जिप्सी, एक ट्रक आणि एक रुग्णवाहिका होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

St Estevam: संतापजनक! आठवीत शिकणाऱ्या 10 मुलांना वळ उठेपर्यंत मारहाण, सांतइस्तेव येथील शिक्षिकेवर गुन्हा दाखल

Goa Politics: 'एसटींसोबत रक्‍ताचे नाते सांगणारे आले अन् गेले'; मुख्‍यमंत्री, सभापतींकडून गावडेंवर खोचक ‘बाण’

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

SCROLL FOR NEXT